Nashik News : साहेब, बाग चोरी गेल्यावरच गुन्हा दाखल करणार काय? पिंपळगावच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा पोलिसांना सवाल

Crime News : शेतकरी हतबल झाले असून, ‘साहेब, संपूर्ण बाग चोरी गेल्यावरच गुन्हे दाखल करणार काय?’ असा सवाल पोलिसांना केला आहे.
pomegranate & police
pomegranate & policeesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : काबाडकष्टातून डाळिंब बाग पिकवली. पण, चोरट्यांनी रात्रीतून ३० क्विंटल डाळिंबावर डल्ला मारला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करुन घेतला. त्याच दिवशीच्या रात्री पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्याची डाळिंब चोरी करीत असताना संशयितांना रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चोरटे दुचाकी सोडून पसार झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, ‘साहेब, संपूर्ण बाग चोरी गेल्यावरच गुन्हे दाखल करणार काय?’ असा सवाल पोलिसांना केला आहे. (police no action on pomegranate crop theft in pimplegaon)

पिंपळगाव बसवंत येथील वणी रोडवरील मुरलीधर विधाते यांच्या बागेतील सुमारे १५० क्रेटस डाळिंब शुक्रवारी (ता. १९) चोरी झाली. विधाते यांनी शनिवारी पोलिस ठाण्यात जात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज दाखल करुन घेतला. दुसऱ्याच दिवशी रविवारी (ता. २१) रात्री रामभाऊ शिंदे यांच्या बागेतील डाळिंबावर चोरटे हात साफ करीय असताना त्यांना शेतकऱ्यांनी रंगहाथ पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

संशयितांनी दुचाकी घटनास्थळीच सोडून पळ काढल्याने पोलिसांना संशयितांचा शोध घेणे सोपे जाणार आहे. पिंपळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिस गस्त घालत आहेत. मात्र, तरीही चोरीच्या घटना थांबता थांबत नाही. त्यामुळे नागरीक वैतागले आहेत. (latest marathi news)

pomegranate & police
Nashik Crime News : म्हसरुळ लिंकरोडवर पोलिसांनी गोवंशांची तस्करी करणारा ट्रक पकडला; 26 गोवंशांची सुटका

देवी मंदिरात चोरीचा प्रयत्न

येथील वणी रोडवरील जगदंबा देवी मंदिरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी दरवाजाच्या कुलूपा तोडण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शनिवारी शेतकऱ्यांची बैठक

पिंपळगाव बसवंत परिसरात लागोपाठ दोन शेतकऱ्यांच्या डाळिंबाची चोरी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवारी (ता. २७) शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

"पोलिसांनी अद्याप ठोस कार्यवाही केलेली नाही. संशयितांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या असून, एक दुचाकी सोडून देण्यात आली आहे. अद्याप एका संशयिताची दुचाकी पोलिसांकडे आहे. त्यावरून संशयिताचा शोध घेतल्यास चोरी उघड होईल."

- उद्धव शिंदे, शेतकरी, पिंपळगाव बसवंत

pomegranate & police
Dhule Crime News : धुळ्यात रस्तालूट करणारी टोळी गजाआड! पावणेसात लाखांची रोकड हस्तगत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com