Nashik Crime News : वृद्धेचा मारेकरी पोलिसांच्या हाती लागेना! शोध पथके रिकाम्या हाती परतली

Nashik News : दिंडोरी रोडवरील गुलमोहोर नगर येथे पाच दिवसांपूर्वी झालेल्या ८० वर्षीय वृद्‌धेच्या निर्घृन खूनाचा मारेकरी अद्यापही पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.
Nashik Crime News
Nashik Crime News esakal
Updated on

Nashik News : दिंडोरी रोडवरील गुलमोहोर नगर येथे पाच दिवसांपूर्वी झालेल्या ८० वर्षीय वृद्‌धेच्या निर्घृन खूनाचा मारेकरी अद्यापही पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. म्हसरुळ पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके संशयिताच्या मागावर आहेत, परंतु, अद्यापही संशयित युवक त्यांच्या हाती न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (police not found killer of old woman)

कुसुम सुरेश एकबोटे (८०, रा. राधानंद निवास, स्वामी समर्थ केंद्राजवळ) यांचा गेल्या बुधवारी (ता.१०) सकाळी दहा वाजता घरात असताना मानेवर धारदार विळ्याने अनेकवार करुन सोसायटीतील २२ वर्षीय युवक पसार झालेला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही, घरातील काही पुरावे व आजूबाजूच्या नागरिकांकडे तपास करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले.

श्वानपथकानेही संशयिताचा काहीसा माग काढला. तपासात ज्या विळ्याच्या सहाय्याने एकबोटे यांच्या गळ्यावर वार करण्यात आले तो विळा संशयिताच्या घरातील असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन त्याचा माग काढला. त्यावरुन पाचपैकी एक पथक हरसूल येथे पोचले. (latest marathi news)

Nashik Crime News
Nashik Crime News : वृद्धेच्या खुनातील संशयित शेजारील असल्याचा निष्पन्न! गुन्हे शाखेकडून शोध सुरू

मात्र पोलिस पोचण्यापूर्वीच संशयित तेथून पसार झाला होता. या पथकासह अन्य पथके रिकाम्या हाती परतली. सध्या म्हसरुळ पोलिसांसह युनिट एकचे पथक संशयिताचा शोध घेत आहे. संशयित सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी कारागृहाचीही त्याने वारी केली आहे.

सज्जनता नडली

काही महिन्यापासून एकबोटे या राधानंद निवासात राहण्यास आल्या होत्या. संशयित युवक बेरोजगार व व्यसनी असल्याने कुसुम एकबोटे यांनी त्यास एक, दोन वेळा सज्जनतेच्या भूमिकेतून चांगला वागण्याचा सल्ला दिला होता. संशयिताने तो सल्ला न मानता त्यांच्याविषयी मनात राग धरून संधी मिळताच त्यांचा निर्घृण खून केल्याचे तपासातून समोर येते आहे.

Nashik Crime News
Nashik Crime News : विळ्याच्या साहाय्याने वृद्धेचा खून! गुलमोहर नगर परिसरातील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.