Nashik News : आयुक्तालय हद्दीतील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंमलदाराने सोशल मीडियावर केलेले ‘लाईव्ह’ चांगलेच व्हायरल झाले असून, आयुक्तालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत अंमलदाराने केलेले आरोपात तथ्य नसल्याचे चौकशीतून समोरही आले आहे. परंतु नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या या अंमलदारावर आता कारवाईची शक्यता व्यक्त होते आहे. (Police officer made trouble on social media)