Nashik Police : श्रावण मासासाठी शहर-ग्रामीण पोलीसांची सज्जता! बंदोबस्तासह वाहतूक नियोजनाबाबत आढाव बैठक

Nashik News : भाविक नाशिक - त्र्यंबकरोडनेच जात असल्याने शहर व ग्रामीण पोलिसांकडून त्या दृष्टीकोनातून नियोजनाची आखणी केली जात आहे.
Trimbakeshwar temple & police
Trimbakeshwar temple & policeesakal
Updated on

Nashik Police : येत्या सोमवारपासून (ता. ५ ऑगस्ट) श्रावण मासाला प्रारंभ होतो आहे. श्रावणमासात शहरातील महादेव मंदिरांमध्ये गर्दी होत असते. त्यामुळे शहर पोलिसांकडून वाहतूक नियोजनाची आखणी सुरू आहेत. त्याचप्रमाणे, त्र्यंबकेश्वर येथेही भाविकांची गर्दी होत असते. बहुतांशी भाविक नाशिक - त्र्यंबकरोडनेच जात असल्याने शहर व ग्रामीण पोलिसांकडून त्या दृष्टीकोनातून नियोजनाची आखणी केली जात आहे. (Nashik Police Preparedness of city rural police for Shravan month)

नाशिक शहरातील गंगाघाटावरील श्री कपालेश्वर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर येथील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले त्र्यंबकराजा मंदिर याठिकाणी लाखो भाविकांची श्रावण महिन्यात गर्दी होत असते. यासंदर्भात पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आढावा बैठक घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

तर, शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही पंचवटी, गंगापूर पोलिस ठाण्यासह पोलीस अधिकार्यांसमवेत शहरातील महादेव मंदिराचा आढावा घेतला आहे. गंगा घाटावरील श्री कपालेश्वर मंदिर, गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिर याठिकाणी गर्दी होत असल्याने या परिसरात वाहनतळे, वाहतूक मार्गात बदल यासंदर्भातील कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत. (latest marathi news)

Trimbakeshwar temple & police
Nashik Police : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण; विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचा उपक्रम

ब्रह्मगिरी फेरी

त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा फेरीसाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्यासाठी नाशिक शहरातील जुने सीबीएस येथून त्र्यंबकेश्वरसाठी शेकडो बसेस मार्गस्थ होतात. या पार्श्वभूमीवर १८ ते २० ऑगस्ट यादरम्यान, शहरातील वाहतूक मार्गात बदल केला जाणार आहे. तसेच, त्र्यंबकेश्वरकडे जाणार्या खासगी वाहनांसाठी संत गजानन महाराज मंदिराजवळील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यासंदर्भात ग्रामीण पोलीसांचे नियोजन आहे.

कडेकोट बंदोबस्त

दरम्यान, येत्या रविवारी (ता.४ ऑगस्ट) गटारी अमावस्या आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण पोलीसांकडून शनिवारपासूनच (ता. ३) कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मद्यपींकडून वाहने चालवून अपघाताच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे, तशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

Trimbakeshwar temple & police
Nashik Police : विद्यार्थिनीला निर्भया-दामिनी पथकाचा मदतीचा हात; पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.