Nashik Police : रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक ‘ॲक्शन’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आक्रमक

Nashik News : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, सुमारे २ हजार गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Nashik Police Commissioner Sandip Karnik
Nashik Police Commissioner Sandip Karnikesakal
Updated on

Nashik Police : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलीस ठाणेनिहाय संकलन करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, सुमारे २ हजार गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर ७२ सराईत गुन्हेगारांना शहर-जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे मात्र दणाणले आहे. (Nashik Police Preventive action on record criminal police commissioner aggressive news)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून सातत्याने शहरातील गुन्हेगारीला आढावा घेतला जात आहे. तसेच, पोलीस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली होती.

त्यानुसार, पोलीसांकडून सातत्याने या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना नोटिसा बजाविल्या जात आहेत. आत्तापर्यंत आयुक्तालय हद्दीतील १ हजार ९४१ रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच, पोलीस पथकांकडून या गुन्हेगारांच्या हालचालींवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

त्याचप्रमाणे, गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांचीही माहिती पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार संकलित करण्यात आली होती. या सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.

परंतु त्यानंतरही त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा न झाल्याने गेल्या दोन तीन महिन्यात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ७२ सराईत गुन्हेगारांना शहर-जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. यात सर्वाधिक २३ सराईत गुन्हेगार हे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.  (latest marathi news)

Nashik Police Commissioner Sandip Karnik
Nashik Women Police: गुन्हेशोध पथकांमध्ये दिसणार महिला पोलीस! पोलीस आयुक्तांचा आदेश; पुरुष मक्तेदारीला छेद

‘राजकीय’ गुन्हेगारांवर कधी?

पोलीस आयुक्तांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवायांसह गुन्हेगारांवर स्थानबद्धता, हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. परंतु अजूनही राजकीय वरदहस्त असलेले सराईत गुन्हेगार मात्र शहरात उजळमाथ्याने फिरत आहेत. तर काही शिक्षा लागूनही जामीनावर बाहेर येत शहरात राजकीय पदाधिकार्यांसमवेत फिरताना दिसत आहे. अशा गुन्हेगारांविरोधात आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई पोलिस ठाणेनिहाय

पोलीस ठाणे........हद्दपार........प्रतिबंधात्मक कारवाई

पंचवटी....८....१८६

आडगाव....०....११८

म्हसरुळ .... ७......६७

भद्रकाली ....२३ ..... १७२

सरकारवाडा ....४....३९

गंगापूर.....६....१०४

मुंबई नाका.... ० ....१०६

सातपूर ....३....१९०

अंबड.....७.....२४५

इंदिरानगर .....६....१८०

नाशिकरोड....१.....१९६

देवळाली कॅम्प.... ५.....१४१

उपनगर....२....१९७

"लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. येत्या काळात या कारवाया अधिक तीव्र केल्या जातील."

- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक

Nashik Police Commissioner Sandip Karnik
Nashik Police : टवाळखोरांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद! मोकळ्या मैदानांवर शहर पोलिसांचे ‘सर्च ऑपरेशन’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.