नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या बुधवारी (ता. २५) नाशिकला येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, रविवारी (ता. २२) देखील लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री व भाजपा नेत्यांनी नाशिकमध्ये आले होते. गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर सलग ४८ तासांपेक्षा अधिकचा कडेकोट बंदोबस्त करणार्या शहर पोलीसांवर येत्या आठवड्यात आणखी ताण वाढणार आहे. (Police ready for APP deployment Union Home Minister in city on 25th )
रविवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री भपेंद्र यादव व भाजपाच्या ज्येष्ठ नेते नाशिकमध्ये आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते नाशिकमध्ये येण्याचे संकेत आहे. त्यानुसार, येत्या बुधवारी (ता. २५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नाशिकला येत आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा सातपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये होणार आहे. या मेळाव्याला गृहमंत्री शहा हजेरी लावून मार्गदर्शन करणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आत्तापासूनच सतर्क झाली आहे. सातपूर परिसरातील हॉटेल तसेच, मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांच्या संख्येची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. तसेच, या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. (latest marathi news)
गोपनीय शाखा सतर्क
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच पक्षांचे नेत्यांचे दौरे होण्याची शक्यता आहे. यामुळे शहर गोपनीय शाखा सतर्क झाली आहे. शहरातील राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांच्या बैठका, हालचालीवर पोलीसांकडून नजर ठेवली जात आहे. तसेच राष्ट्रीय नेत्यांच्या दौऱ्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासंदर्भातही गोपनीय शाखांकडून शहरात बारकाईने नजर ठेवली जात आहे.
असे असेल बंदोबस्त
उपायुक्त - दोन
सहायक आयुक्त : तीन
पोलीस निरीक्षक : १५
सहायक निरीक्षक : ३०
पोलिस अंमलदार : ५००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.