Nashik Police Recruitment : पोलीस भरतीतील ‘इडब्ल्युएस’चा पेच कायम; उर्वरित उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणी

Nashik News : यासंदर्भात पोलीस आयुक्तालयास पोलीस महासंचालकांकडून मागविण्यात आलेल्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा आहे.
medical test police recruitment
medical test police recruitmentesakal
Updated on

Nashik Police Recruitment : पोलीस भरतीमध्ये मराठा उमेदवारांनी इडब्ल्युएस (आर्थिक दूर्बल घटक) यातून अर्ज केल्याने पेच निर्माण झाला असून, अजूनही तो कायम आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तालयास पोलीस महासंचालकांकडून मागविण्यात आलेल्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, इडब्ल्युएस, एसईबीसी प्रवर्गातील वगळता उर्वरित प्रवर्गातील उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. (Police Recruitment EWS embarrassment continues)

शहर पोलिस आयुक्तालयाच्या ११८ रिक्त पोलीस शिपाई पदांसाठीची भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मैदानी व लेखी चाचणीनंतर आयुक्तालयाने निवड यादी जारी केली. त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी सुरू असताना त्यामध्ये काही मराठा उमेदवारांनी इडब्ल्युएस (आर्थिक दूर्बल घटक) यातून अर्ज केले होते.

या उमेदवारांसाठी असलेला एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग), ओबीसी (इतर मागासवर्ग), वा खुल्या प्रवर्ग असताना त्यांनी इडब्ल्युएस वर्गातून अर्ज केले. त्यामुळे संबंधितांना त्या वर्गातून अर्ज करण्यासंदर्भाती हमीपत्र मागण्यात आले असता, चौघांनी त्यास नकार दिला आहे. (latest marathi news)

medical test police recruitment
Maharashtra Police Recruitment : पोलीस भरती पुन्हा रखडली! EWS संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाकडे लक्ष

त्यासंदर्भात आयुक्तालयाने पोलीस महासंचालक कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यासंदर्भात प्रशिक्षण पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालकांची बैठक झाली. परंतु त्यात यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. त्यामुळे सदरचा पेच अद्यापही कायम आहे.

दरम्यान, आयुक्तालयाने इडब्ल्युएस आणि एसईबीसी या प्रवर्गात उमेदवार वगळता उर्वरित उमेदवारांची वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पेच कायम असलेल्या प्रवर्गासंदर्भात आयुक्तालयास महासंचालकांच्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा कायम आहे.

medical test police recruitment
Nashik Rural Police Recruitment : EWS मधून उत्तीर्ण महिलेची उमेदवारी रद्दची शक्यता! प्रवर्ग गोंधळामुळे उमेदवार द्विधा मनस्थितीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.