Nashik Police : सहा महिन्यात 174 गोवंशांची सुटका! आयुक्तालय हद्दीत 54 गुन्हे दाखल

Crime News : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गोवंशीय तस्करी आणि गोवंशीय कत्तलीविरोधात कडक धोरण अवलंबिले आहे.
Police Rescued Cattles
Police Rescued Cattlesesakal
Updated on

Nashik Police : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये गोवंशीय जनावरांची अवैधरित्या होणारी कत्तल व तस्करीविरोधात शहर पोलिसांनी धडक कारवाई करीत १७४ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. तसेच, ९८ संशयितांना अटक करीत गुन्हे दाखल केले आहेत. (Nashik Police Rescued 174 cows in six months)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गोवंशीय तस्करी आणि गोवंशीय कत्तलीविरोधात कडक धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये आयुक्तालय हद्दीतून कत्तलीसाठी आणण्यात आलेली वा तस्करी करण्यात येणाऱ्या १७४ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे.

या सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना गोशाळेत दाखल करण्यात आलेले आहे. शहर आयुक्तालय हद्दीमध्ये गोवंशीय कत्तली वा तस्करीचे ५४ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यातील २६ गुन्ह्यांमध्ये १७४ गोवंशांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. (latest marathi news)

Police Rescued Cattles
Nashik Crime: घोटी टोलनाका आंदोलनात दिवंगत ‘शोभा मगर’ यांच्यावर गुन्हा; ग्रामीण पोलिसांचा भोंगळ कारभार! गुन्ह्यातून नाव वगळण्याची पोलिसांवर उपरती

९८ संशयित जेरबंद

गोवंशांची तस्करी करताना ९८ संशयितांना पोलिसांनी अटक केलेली आहे. यातील ३१ जणांविरोधात दोन वा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर शहर-जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई आयुक्तालयाने केलेली आहे. तसेच, पोलीसांनी ८४ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संपर्कासाठी आवाहन

शहरातील गोवंशीय जनावरांची कत्तल वा तस्करी रोखण्यासाठी पोलीसांनी आवाहन केले आहे. यासंदर्भात गोवंशांची अवैध वाहतूक वा कत्तलीशी संबंधित कोणतीही सूचना देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर (९९२३३२३३११) संपर्क साधावा.

Police Rescued Cattles
Nashik Crime News : म्हसरुळ लिंकरोडवर पोलिसांनी गोवंशांची तस्करी करणारा ट्रक पकडला; 26 गोवंशांची सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.