नाशिक : ‘त्यांच्या’ कुटुंबीयांसाठी खाकी ठरली देवदूत

Police with saved patient
Police with saved patientesakal
Updated on

नाशिक : सर्वसामान्य जनता ही पोलिसांकडे (Police) एका भीतीच्या नजरेने बघते. परंतु, या खाकी वर्दीतही माणूस असतो, याचा प्रत्यय नाशिकमध्ये नुकत्याच घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांवरून आला आहे. गुन्हेगारी (crime) घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना ‘पोलिस दादा’ ने वेळीच रुग्णालयात (Hospitalized) दाखल करून तातडीचे उपचार मिळवून दिल्याने दोहोंचेही प्राण वाचले. पोलिसांच्या या कामगिरीने एका आईचा आधार आणि एका मुलास आईविना पोरकं होण्यापासून वाचविले आहे. पोलिसांच्या कार्य तत्परतेमुळे हे शक्य झाल्याने सर्वच स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे. तसेच, खरंच पोलिस आमच्यासाठी देवदूतच (Angels) ठरले, अशा प्रतिक्रिया पीडितांच्या नातेवाइकांनी व्यक्त केल्या आहेत. (Nashik Police Saved 2 people in 2 different crime cases from death Nashik News)

मागील आठवड्यात पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत दीपक डावरे नामक युवकावर प्राणघातक हल्ला झाला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. तसेच म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत चंदा ठाकूर यांच्यावर पतीने कटरने वार करून जीव मारण्याचा प्रयत्न केला होता. यात ठाकूर या गंभीर जखमी झाल्या होत्या. या दोन्ही घटनांमध्ये परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी तत्काळ धाव घेत संबंधित पोलिस ठाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने लागलीच जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते. संबंधित जखमी दीपक व चंदा यांना वेळीस योग्य उपचार सुरू आहेत की नाही. तसेच, त्यांना काही अडचणी आहेत का याकडे संबंधित पोलिस ठाणे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन होते. या संदर्भात स्वतः पोलिस उपायुक्त अमोल तांबे हे लक्ष देत वेळोवेळी उपचार सुरू असताना विचारपूस करीत होते.

Police with saved patient
Nashik : डॉक्टरवर हल्ला करणारे संशयित पोलिसांच्या ताब्यात

अन्यथा मी अनाथ झालो असतो...

दीपकच्या आईने म्हणाली, की पंचवटी पोलिसांचे व अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेले प्रयत्न व सहकार्यामुळे माझ्या मुलाचे प्राण वाचले. त्यामुळे मी त्याचे मनापासून आभार मानते. चंदा ठाकूर यांचा मुलगा म्हणाला, की वडील राजू ठाकूर यांनी माझी आईच्या गळ्यावर कटरने वार करून त्यांनी स्वतः: आत्महत्या केली. यामध्ये म्हसरूळ पोलिस व आडगाव पोलिस, अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्न व सहकार्यामुळे माझी आई आज जिवंत आहे. अन्यथा मी अनाथ झालो असतो, अशा प्रतिक्रिया दिली.

Police with saved patient
Nashik : पहिल्याच पावसात 93 घरांची पडझड

आयुक्तांच्या आदेशाचे पालन

नाशिक शहर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांमधील संशयितांना तत्काळ जेरबंद करणे व पीडित गंभीर जखमींना रुग्णालयात दखल करण्यापासून ते बरे होईपर्यंत लक्ष देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेशित केले होते. पंचवटी पोलिस ठाणे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, आडगावचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, म्हसरूळचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की व संबंधित पोलिस ठाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.