Nashik Police : शहरातील संवेदनशिल ठिकाणांसह वर्दळी अन् नेहमीच टवाळक्याचा धुडगूस असलेल्या ठिकाणे निश्चित करून गुगल मॅपिंगद्वार जीपीएस मॉनिटरिंग (ग्राऊंड प्रेझेन्स सिस्टिम) आयुक्तालय हद्दीत कार्यान्वित झाली आहे. सुमारे ९३३ स्पॉटस्ला हजार अंमलदारांना पेट्रोलिंग करताना नियमित जीपीएस लोकेशन शेअर करावे लागणार आहे.
ते शेअर केल्यानंतरच वरिष्ठ अधिकार्यांना अंमलदारांच्या पेट्रोलिंगची स्थिती तत्काळ कळते आहे. पहिल्याच दिवशी आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये पंचवटी पोलीस ठाणे जीपीएस मॅपिंग करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. (Nashik Police smart policing due to GPS monitoring news)
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून ‘जीपीएस मॉनिटरिंग : सुरक्षित नाशिक’ हा आधुनिक आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स ॲपच्या मदतीने स्मार्ट उपक्रम नाशिक आयुक्तालयात राबविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये ‘जीपीएस मॉनिटरिंग’ ॲपचे अनावरण आणि त्यानंतर पोलिस अंमलदारांना प्रशिक्षणही देण्यात आले.
या ॲपचा प्रत्यक्ष वापर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आला आहे. आयुक्तालय हददीतील ९३३ ठिकाणं गुगल मॅपिंगदवारे निश्चित करण्यात आलेली आहेत. यात भविष्यात वाढही होण्याची शक्यता आहे. मॅपिंग केलेल्या ठिकाणांमध्ये बँका, वर्दळीची ठिकाणं, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजी मार्केट, शाळा-महाविद्यालये, संवेदनशिल ठिकाणांसह मतदान केंद्रही आहेत.
अशी आहे जीपीएस पेट्रोलिंग
- पेट्रोलिंग करणार्या पोलीस अंमलदारांकडील ॲण्ड्राईड मोबाईलमध्ये ‘जीपीएस मॉनिटरिंग’ ॲप इन्टॉल करण्यात आले आहे.
- पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुगल मॅपिंग करण्यात आलेला स्पॉट काळ्या/तांबड्या रंगाने मार्किंग केला आहे
- पेट्रोलिंग करणारा अंमलदार त्या स्पॉटला पोहोचल्यानंतर त्याने त्या स्पॉटवरून ॲपच्या माध्यमातून फोटो काढायचा
- गुगल मॅपिंग स्पॉटवर फोटो काढल्यानंतर तो अपलोट करायचा
- स्पॉटचा फोटो अपलोड झाल्यानंतर काळा/तांबडा रंगाचा पार्किंग स्पॉट हिरवा होता.
- याचा अर्थ पेट्रोलिंग अंमलदाराने स्पॉटवर जाऊन भेट दिल्याचे निश्चित होते
- स्पॉट व्हिजिट झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, विभागाचे सहायक आयुक्त, परिमंडळाचे उपायुक्तांनाही समजू शकते.
पंचवटी आघाडीवर
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ७६ ठिकाणं गुगल मॅपिंगद्वारे निश्चित करण्यात आली आहे. यात येत्या काही दिवसात आणखी भर पडणार आहे. गेल्या २४ तासांमध्ये आयुक्तालय हद्दीतील जीपीएस मॉनिटरिंगद्वारे करण्यात आलेली जीपीएस पेट्रोलिंगमध्ये पंचवटी पोलीस ठाणे आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्रुटीवर मात
आयुक्तालय हददीत यापूर्वी क्युआर कोड सिस्टिम सुरू केली होती. परंतु त्यावेळी पेट्रोलिंग अंमलदारांनी त्यातून पळवाट शोधन काढत क्युआर कोड ठिकाणावर न जाताही भेट दिल्याचे नोंद करीत होते. जीपीएस प्रेझन्स सिस्टिमने यावर मात केली असून, अंमलदारास प्रत्यक्ष स्पॉटवर जावेच लागणार आहे. त्याशिवाय स्पॉटची मार्किंग ‘अन-व्हिजिटेड’च राहते.
- शहरातील ‘जीपीएस’ मॉनिटेरिंग स्पॉट : ९३३
- ‘जीपीएस’ मॉनिटेरिंग ॲप पेट्रोलिंग अंमलदार : ११३१
- ‘जीपीएस’ मॉनिटेरिंग स्पॉट : ४ प्रकारात (पुढीलप्रमाणे)
१ : सर्वसाधारण ठिकाणं : शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, भाजी मार्केट, गर्दींची ठिकाणे
२ : प्राधान्यक्रमांची ठिकाणं : पुतळे, मंदिर, मस्जिद व धार्मिक स्थळे
३ : निवडणूक ठिकाणं : मतदान केंद्र, मतमोजणी, अतिसंवेदनशील ठिकाणे
४ : नागरिक केंद्रीत : नागरिकांनी सूचित केलेली ठिकाणे
"जीपीएस मॉनिटरिंग सिस्टिममुळे पेट्रोलिंग करणाऱ्यास स्पॉट व्हिजिट करावीच लागणार आहे. त्यामुळे पोलिस प्रेझेन्स दिसून येणार आहे. परिणामी गुन्हेगारीला आळा बसण्यासही मदत होणार आहे." - मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.