Nashik News : पोलिस सोसायटी निवडणुकीत 3 पॅनलमध्ये रंगणार लढत

Nashik News : शहर - ग्रामीण पोलिस कर्मचारी सभासद असलेल्या नाशिक पोलिस को- ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तीन पॅनलमध्ये लढत रंगणार आहे.
Police society elections
Police society elections esakal
Updated on

Nashik News : शहर - ग्रामीण पोलिस कर्मचारी सभासद असलेल्या नाशिक पोलिस को- ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तीन पॅनलमध्ये लढत रंगणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी शहर- ग्रामीणमधील सभासदांच्या भेटीगाठी घेत प्रचार सुरू केला आहे. (Police society elections will be fought in 3 panels)

नाशिक पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नूतन कार्यकारिणी २०२४-२८ साठी २१ जुलैला मतदान होत आहे. निवडणुकीसाठी प्रगती, परिवर्तन आणि दक्षता या तीन पॅनलमध्ये लढत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात सर्वसाधारण गटातील १० जागांसाठी २९, महिला राखीव असलेल्या दोन जागांसाठी ५.

अनुसूचित जाती व जमाती, इतर मागास वर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विमाप्र या गटातून प्रत्येकी एका जागेकरिता ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. प्रगती पॅनलकडून विक्रम कडाळे, श्रीकांत कोळी, गणेश कोंडे, विनोद खांडबहाले, सतीश घाडगे, नितीन चोरघे, अविनाश जुंदरे, कपालेश्वर ढिकले, गणेश पिंगळे, संजय सपकाळे, ऊर्मिला ढमाले, अश्विनी देवरे, नीलेश दळवी, सचिन नेरकर. (latest marati news)

Police society elections
Nashik Police : ‘रॅश-ड्रायव्हिंग’, ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाईचा बडगा! शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार

वृंदावन गिते हे उमेदवारी करीत असून, या पॅनलचे विमान हे निवडणूक चिन्ह आहे. त्याचप्रमाणे, परिवर्तन पॅनलकडून विशाल काठे, दत्तु गारे, युवराज चव्हाण, संदीप झाल्टे, सूरज झोटिंग, किरण धुमणे, प्रशांत मरकड, रूपेश मुळाणे, अश्पाक शेख, संदीप हांडगे, योगिता काकड, वर्षाराणी निकम, जालिंदर खराटे, योगेश राऊत.

विश्वनाथ काकड हे निवडणूक लढवत असून या पॅनलची कपबशी हे निवडणूक चिन्ह आहे. तर, दक्षता पॅनलकडून विजय उशिरे, नरेंद्र चौधरी, प्रशांत पवार, सुनील बाविस्कर, श्रावण माळी, शरद मोरे, प्रवीण वाघमारे, अनिल हिरे, निलीमा पोपटकर, प्रशांत पवार, केशव सूर्यवंशी, प्रमोद कासर्ले हे निवडणुकीच्या रिंगणात असून, जीप हे निवडणूक चिन्ह आहे.

Police society elections
Nashik Tree Plantation : पर्यावरण रक्षणार्थ सरसावले जलसंपदा सेवानिवृत्त अभियंता मित्रमंडळ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com