Nashik News : शहरात राजरोसपणे हत्यारे बाळगणाऱ्यांचा वावर; पोलिसांचे मात्र हातावर हात

Nashik : गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने गुन्हेगारी घटनांनी शहराची कायदा व सुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.
police
police esakal
Updated on

Nashik News : गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने गुन्हेगारी घटनांनी शहराची कायदा व सुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. शहरात राजरोसपणे गुन्हेगारांप्रमाणेच, हत्यारे बाळगणाऱ्यांचा वावर वाढला आहे. बालगुन्हेगारांकडे चॉपर, तलवारी आढळून येत असून, रेकॉर्डवर नसलेल्यांच्याही हाती गावठी कट्टे सहज उपलब्ध होत आहेत. तर, ज्यांच्याकडे शहराच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे ती पोलिस यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून आहे. (nashik city police system marathi news)

त्यामुळे अनायासेच गुन्हेगारांना शहरात दहशत पसरविण्यासाठी रान मोकळे असल्याची भावना नागरिकांमध्ये असून, पोलिसांनी तातडीने शहरातील गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शहराच्या उपनगरीय परिसरांमध्ये सातत्याने हाणामारीच्या घटना घडत आहेत. चोऱ्या, घरफोड्या, वाहनचोरी या तर नित्याच्या घटना झाल्या आहेत. मात्र, अलीकडे हत्यारे बाळगून दहशत माजविणाऱ्या ‘भाईं’ची मुजोरी वाढली आहे.

उपनगरीय परिसरांमध्ये असे भाई राजरोसपणे हातात कोयते, तलवारी भिरकावत दहशत माजवून रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करीत आहेत. तर अनेकांकडे गावठी कट्टेही आढळून येत आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये तलवारी, कोयते, चाकू बाळगून दहशत पसरविल्याप्रकरणी २४ गुन्हे दाखल झाले आहेत तर, याच काळामध्ये गावठी कट्टे बाळगल्याचे ७ गुन्हे दाखल आहेत.

काही २०२३ या वर्षभरात १२८ शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल असून यात २६ गावठी कट्टे आणि १०२ हत्यारे बाळगल्याप्रकरणी गुन्ह्यांचा समावेश आहे. तर यंदाच्या दोन महिन्यांत शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३१ गुन्हे आत्तापर्यंत दाखल झाले आहेत. त्यावरून शहरात अशाप्रकारे हत्यारे बाळगणारे किती आहेत, असा प्रश्न जागरूक नागरिकांना पडला आहे.

police
Nashik News : दीड वर्षाच्या रायबाने 6 तासात सर केला शिवनेरी किल्ला! उमराणेतील बालकाचा संकल्प पूर्ण

‘या’ गोळीबारांचा लागेना तपास

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये रिपाइंचे पदाधिकारी व श्री कपालेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रशांत जाधव यांच्यावर उत्तमनगर येथे अज्ञातांनी गोळी झाडली होती. या घटनेला दोन वर्षे उलटूनही अद्याप संशयितांचा तपास लागू शकलेला नाही.

तसेच, गेल्या डिसेंबर महिन्यातही पवननगर भाजी मार्केट येथे गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी अंबड पोलिसात गावभर चर्चा झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. परंतु त्यातही अद्यापपर्यंत गोळीबार करणाराही अटक नाही आणि ज्याच्यावर गोळीबार झाला होता, त्याचाही जाबजबाब झाला की नाही हे सारे गुलदस्त्यात आहे.

बेधडक वार

लहानसहान कुरापतीच्या भांडणांमध्ये संशयितांकडून चाकू, चॉपर वा तलवारींचा वापर करून एकमेकांवर वार केल्याच्या घटना घडत आहेत. यावरून गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही, असेच अधोरेखित होत असल्याचे बोलले जात आहे. (latest marathi news)

police
Nashik News : शहरात 47 आरोग्यवर्धिनी केंद्रांना अखेर मुहूर्त; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पंचवटीत आज उद्घाटन

वर्षनिहाय शस्त्र बाळगल्याचे गुन्हे (ग्राफिक्ससाठी)

गुन्ह्याचा प्रकार ....... २०२२......२०२३.......२०२४ (फेब्रुवारी अखेर)

गावठी कट्टे......२२........२६......७

हत्यारे .......८८........१०२........२४

एकूण.......११०..........१२८.........३१

''बेकायदा हत्यारे बाळगणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे. गावठी कट्टे परराज्यातून शहरात दाखल होतात, त्यांचाही शोध घेऊन कारवाई केली जाईल.''- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

police
Nashik News: रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे; बांधकामला ठोकले टाळे! सटाण्यात महाविकास आघाडीकडून रिकाम्या खुर्चीला हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.