Nashik Police : गेल्या आठवडाभरापासून शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (ता. ९) ट्रीपलसीट दुचाकीस्वारांना लक्ष्य करीत वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर, स्मार्ट रोडवर वाहतूक शाखेने नो-पार्किंगमधील चारचाकी वाहने व नो-पार्किंगमधील रिक्षांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. (Nashik Police Triple seat on radar of traffic department news)
शहरातील विस्कळीत वाहतुकीला आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी शहर वाहतूक शाखेकडून गेल्या आठवडाभरापासून धडक कारवाई सुरू आहे. वाहतूक शाखेच्या पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिकरोड या चारही विभागात एकाचवेळी कारवाई केली जात आहे. विना हेल्मेट-सीटबेल्ट वाहनचालकांविरोधात धडक कारवाईनंतर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकाविरोधात कारवाईचा बडगा उगारला.
वाहतूक शाखेने मंगळवारी (ता. ९) ट्रीपलसीट वाहन चालकांविरोधात मोहीम राबविली. यामुळे अनेक रस्त्यांवर ट्रीपलसीट दुचाकीस्वारांची चांगली तारांबळ उडाली. वाहतूक शाखेच्या पथकांनी सिग्नलवर न थांबता उपनगरीय रस्त्यावर चेकिंगसाठी थांबून ट्रीपलसीट दुचाकीस्वारांवर इ-चलानद्वारे ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली. (latest marathi news)
तसेच, यावेळी बेशिस्त रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली. विशेषत: फ्रंटसिट रिक्षाचालकांना टार्गेट करण्यात आले. वाहतूक शाखेच्या चारही विभागात सदरची कारवाई करण्यात आली. पंचवटीत पेठरोड, दिंडोरी रोड, दिंडोरी नाका, रेडक्रॉस सिग्नल, सरकारवाडा हद्दीत चोपडा लॉन्स, कॅनडा कॉर्नर, शरणपूर पोलीस चौकी, अंबड विभागात पाथर्डी फाटा, नाशिकरोड विभागात जेलरोड, बिटको चौक, दत्त मंदिर चौक, विहितगाव सिग्नल, नांदूर नाका याठिकाणी कारवाई करण्यात आली.
स्मार्ट रोडवरही कारवाई
स्मार्टरोडवर बिनधास्तपणे नो-पार्किंगमध्ये चारचाकी, रिक्षा व दुचाक्या पार्क केल्या जातात. अशोकस्तंभ परिसरात असलेल्या वडापावच्या दुकानांसमोर ग्राहकांकडून रस्त्यालगतच वाहने पार्क केली जातात. मंगळवारी मात्र वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार श्रीमती धीवर यांनी इ-चलानद्वारे वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या व नो-पार्किंगमधील चारचाकी, रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.