Human Trafficking Case : दराडेंबाबत पोलिस अनभिज्ञ! मानवी तस्करी प्रकरण : ‘एनआयए’कडून अटक

Nashik News : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी (ता. १४) सुदर्शन दराडे यास मानवी तस्करी प्रकरणी अटक केली आहे.
Human Trafficking Case
Human Trafficking Caseesakal
Updated on

Nashik News : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी (ता. १४) सुदर्शन दराडे यास मानवी तस्करी प्रकरणी अटक केली आहे. दराडे मुळचा नाशिकचा आहे. मात्र, दराडे याच्यासंदर्भात नाशिक शहर वा ग्रामीण पोलिस अनभिज्ञ आहेत. तसेच ‘एनआयए’कडून अद्याप तरी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. (Nashik Police unaware of Sudarshan Darade)

राष्ट्रीय तपास यंत्रणेने मानवी तस्करी प्रकरणी देशभरातून आत्तापर्यंत सहा संशयितांना अटक केली. यात सुदर्शन दराडे याचा समावेश आहे. दराडे दुबईमार्गे परदेशात पलायन करण्याच्या बेतात असतानाच ‘एनआयए’च्या पथकाने त्यास अटक केली होती.

तपासकामी सध्या तो ‘एनआयए’च्या ताब्यात आहे. दराडे मुळचा नाशिकचा असून, ‘एनआयए’च्या पथकाने त्यास कोठून अटक केली, हे मात्र गोपनीय ठेवण्यात आले आहे. (latest marathi news)

Human Trafficking Case
Nashik Police Promotion : राज्यातील 139 निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती; शहरातील चौघांचा समावेश

तसेच यासंदर्भातील कोणतीही माहिती नाशिक शहर वा ग्रामीण पोलिसांना देण्यात आलेली नाही.

तसेच दराडे याचे कुटुंबीय नाशिकमध्येच वास्तव्याला असून, त्यासंदर्भात काही सूचनाही ‘एनआयए’कडून पोलिसांना मिळालेल्या नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Human Trafficking Case
Nashik Fraud Crime : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून 6 कोटींचा गंडा! आंतरराज्य टोळी कार्यरत; तब्बल 62 जणांना फसविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com