Nashik Police : शहर पोलीस ठाण्यांची ‘व्हर्च्युअल टूर’! शहर पोलीस आयुक्तालयाचा अनोखा उपक्रम

Nashik News : अलिकडे कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून पोलिस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
A photo of the virtual tour of Panchvati Police Station under the Virtual Tour initiative on the City Police Commissionerate handle on social media.
A photo of the virtual tour of Panchvati Police Station under the Virtual Tour initiative on the City Police Commissionerate handle on social media.esakal
Updated on

Nashik Police : पोलीस आणि पोलीस ठाणे म्हटले की आजही अनेकांच्या मनात धडकीच भरते. अनेकांना तर पोलिसांचा नेहमी वाईटच अनुभव येत असल्याने साऱ्यांचा समजही तसाच असतो. परंतु अलिकडे कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून पोलिस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

परिणामी नागरिकांच्या मनातील पोलिसांविषयीची भिती काही प्रमाणात नाहिशी होते आहे. असे असले तरी पोलिसिंगविषयी अनेकांना उत्सुकता असते. तीच उत्सुकता आणि पोलिसिंग दाखविण्यासाठी आयुक्तांच्या संकल्पनेतून शहरातील पोलीस ठाण्यांची ‘व्हर्च्युअल टूर’ उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. (Nashik Police Virtual Tour of City Police Stations)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारल्यापासून कम्युनिटी पोलिसिंगच्या अंगाने सातत्याने नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून उपक्रम राबवित आहेत. त्यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर करून घेतला जात आहे. त्यांच्याच संकल्पनेतून शहरातील पोलीस ठाण्यांची ‘व्हर्च्युअल टूर’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या व्हर्च्युअल टूरची सुरुवात पंचवटी पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पोलीस ठाण्यातील प्रत्येक दालनाची, तेथील कामकाजाची, अंमलदारांकडून सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच, पोलिस केवळ बंदोबस्त, गस्त, गुन्हेगारांचा शोध घेणे एवढेच काम करीत नाहीत, तर त्यामागे अनेकप्रकारच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागत असल्याचे यातून दिसून येते. (latest marathi news)

A photo of the virtual tour of Panchvati Police Station under the Virtual Tour initiative on the City Police Commissionerate handle on social media.
NEET Exam : ‘नीट’ संदर्भात ८ जुलै रोजी सुनावणी; सरन्यायाधीश २६ याचिका निकाली काढणार

ठाणे अंमलदारांकडून आलेल्या तक्रारदारांची तक्रार घेणे, या तक्रारींचे ऑनलाईन अपडेट करणे, गुन्ह्यांच्या तपासाचे दस्तऐवजांचे जतन करणे, पोलीस कोठडी आणि तेथील संशयित यासह अनेक विभागांची माहिती या व्हर्च्युअल टूरमध्ये मधुकर कड यांनी दिली. ही व्हर्च्युअल टूर नाशिककरांना व्हॉटसॲप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम, एक्स-ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.

"पोलीस ठाण्यांच्या ‘व्हर्च्युअल टूर’मुळे जे कधीही पोलीस ठाण्यात गेलेले नाहीत, त्या नागरिकांना पोलीसांच्या कामकाजाची माहिती होईल. यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात समन्वयाचा सेतू तयार होण्यास मदत होईल."- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक.

A photo of the virtual tour of Panchvati Police Station under the Virtual Tour initiative on the City Police Commissionerate handle on social media.
Maharashtra News Updates : हाथरसमध्ये मृत्यूतांडव तर महाराष्ट्र विधानसभा गाजली, दिवसभरात काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.