Nashik Political News: पश्चिम मतदारसंघात समीकरण बदलाची चर्चा! दुसऱ्या फळीतील उमेदवारांची नावे चर्चेत

Political News : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात अशा प्रकारचा काहीसा सूर सध्या काही मातब्बर व्यक्तींकडून ऐकायला मिळत आहे.
Nashik Political News
Nashik Political Newsesakal
Updated on

सिडको : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात अशा प्रकारचा काहीसा सूर सध्या काही मातब्बर व्यक्तींकडून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाकडून कधी काय निर्णय जाहीर होईल, याचा काही नेम नाही.

म्हणूनच की काय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे समीकरण उमेदवारांच्या बाबतीत काही अंशी बदलण्याची चर्चा सध्या पक्षांतर्गत चर्चा ऐकू येत आहे. (Nashik Political West Constituency marathi news)

बरेच जण सध्या विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र सिडको परिसरात यानिमित्ताने दिसून येत आहे. त्यात प्रत्येक राजकीय पक्षातील चार ते पाच जण पश्चिम विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

तशी चर्चादेखील दबक्या आवाजात सुरू आहे. परंतु काही जण याबाबत प्रत्यक्ष बोलताना दिसताय तर काहीजण आपण आपले पत्ते ऐनवेळी ओपन करू असे सांगताना दिसत आहे. त्यामुळे पश्चिम विधानसभा राजकारणात कधी काय होईल, याचा काय नेम नाही.

पहिल्या फळीमध्ये आमदार सीमा हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, शिवाजी चुंभळे, नाना महाले, लक्ष्मण जायभावे, सुधाकर बडगुजर आदींची नावे जरी चर्चेत दिसून येत असले तरी मात्र दुसऱ्या फळीतील जुन्या व काही अंशी युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते. (Latest Marathi News)

Nashik Political News
Thane Politics: आधी घर सांभाळा, मग आव्हान द्या ; नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला

याबाबत ऐनवेळी पक्ष स्तरावर काय निर्णय होईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे सध्या तरी या दुसऱ्या फळीतील उमेदवारांची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यातील काही नावे समोर आल्यानंतर धक्का बसल्यास आश्चर्य वाटायला नको !

चर्चेतील नावे :

*भाजप : प्रदीप पेशकार, दिलीपकुमार भामरे, अजित चव्हाण, सोनाली पवार, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, अश्विनी बोरस्ते, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे.

*ठाकरे गट : डी. जी. सूर्यवंशी, हर्षा बडगुजर, मंदाकिनी दातीर

*शिवसेना (शिंदे गट) : मामा ठाकरे, प्रवीण तिदमे, संजय साबळे, अस्मिता देशमाने

*राष्ट्रवादी काँग्रेस: डॉ. योगिता हिरे व राजेंद्र महाले

*मनसे : अक्षय खांडरे,

*काँग्रेस : वंदना पाटील व विजय पाटील

*वंचित बहुजन आघाडी : अविनाश शिंदे

*आरपीआय : ॲड. प्रशांत जाधव, चंद्रकांत पाटोळे

*अपक्ष : अजिंक्य चुंबळे

Nashik Political News
Kalyan Politics: आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.