Dr. Neelam Gorhe : मी नव्हे, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू इच्छूक : डॉ. गोऱ्हे; भाजपच्या जागेसाठी शिवसेनाही आग्रही

Latest Political News : श्री रेणूका देवी यात्रोत्सवात हजेरी लावत लाडक्या बहिणीशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्यांच्या वक्तव्याने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
Chandwad: Speaking in the program here, Dr. Neelam Gorhe, neighbor Bhausaheb Chaudhary
Chandwad: Speaking in the program here, Dr. Neelam Gorhe, neighbor Bhausaheb Chaudharyesakal
Updated on

गणूर : चांदवड देवळा विधानसभेची जागा चर्चेत आहे, या जागेसाठी शिवसेना पक्ष आग्रही आहे, चर्चेअंती ही जागा शिवसेना पक्षास सुटल्यास भाऊसाहेब चौधरी यांना उमेदवारी द्यायची आहे. असं वक्तव्य शिवसेना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. श्री रेणूका देवी यात्रोत्सवात हजेरी लावत लाडक्या बहिणीशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्यांच्या वक्तव्याने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. (Dr neelam Gorhe Shiv Sena also insisting for seat of BJP)

भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर गेल्या दोन पंचवार्षिक पासून या मतदार संघात प्रस्थ निर्माण करू पाहतायत याच जोरावर विजयाची हॅट्रिक ते साधतील असा मतप्रवाह भाजपा पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. आमदार डॉ. आहेर यांचे बंधू केदा आहेर देखील भाजपाकडून इच्छूक आहेत. विद्यमान आमदारांच्या दोन पंचवार्षिक विजयाचे शिल्पकार म्हणून केदा आहेरांची चर्चा आहे.

याशिवाय चांदवड मधून नगराध्यक्ष भूषण कासलीवाल हे देखील पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत. भाजप नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे उमेदवारीसाठी मुलाखत देत भाजपाकडून इच्छुकांच्या यादीतील चर्चा थांबवली असली तरी चांदवड तालुक्यात त्यांची असलेली पकड पक्षाला ज्ञात असून या मुलाखतीनंतर देखील भाजपा त्यांना सोबत घेऊन चालण्याच्या भूमिकेत आहेत. (latest marathi news)

Chandwad: Speaking in the program here, Dr. Neelam Gorhe, neighbor Bhausaheb Chaudhary
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींची हत्या; सलमानशी मैत्री जीवावर बेतली? बिश्नोई गँगनं काटा काढला?

शिवसेनेची दावदारी

चांदवड देवळ्यात तिकीट दादाला की नाना ला अशी चर्चा सुरू असताना शिवसेना पक्षाने देखील या जागेवर दावा केल्याने भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाने महायुतीतील नव्या चेहऱ्याची आता चर्चा वाढू लागली आहे. चौधरी हे चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव या मोठ्या गावचे भूमिपुत्र असून शिवसेना पक्षाची राज्यस्तरावर जबाबदारी संभाळताना ते गेल्या आठ वर्षापासून चांदवड मतदार संघावर विशेष लक्ष ठेऊन आहेत. महायुतीतीतल वाढती इच्छुकांची संख्या बघता वरिष्ठांना इथे उमेदवारीचा आग्रह धरल्याने येथील महायुतीतील उमेदवारीची स्पर्धा जोरात असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Chandwad: Speaking in the program here, Dr. Neelam Gorhe, neighbor Bhausaheb Chaudhary
Nanded Assembly Elections 2024: इच्छुक उमेदवारांची वाढली धाकधूक; राजकीय पक्षांना मतदारसंघ जाहीर न झाल्याने चलबिचल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.