इंदिरानगर : मनपा, विधानसभा असो वा लोकसभेची निवडणूक असो भाजपचा हक्काचा बालेकिल्ला म्हणून इंदिरानगरची ओळख आहे. या भागात असलेल्या लाखभर मतांनी नेहमीच भाजपला साथ दिली आहे. असे असले तरीही सतीश कुलकर्णी यांच्या रूपाने गत वेळेस मिळालेले महापौरपद सोडले तर या परिसराला कोणतेही असे खास पद आतापर्यंत मिळालेला नाही. (Indiranagar residents hope for big position in election)