Nashik Lok Sabha Election 2024 : गोड (से) मानून घ्या! शिवसेना कार्यकर्त्यांची भावना! नाशिक लोकसभेच्या जागेवरून मनभेद

Political News : विद्यमान खासदारांबद्दल सर्व स्तरात नाराजी असल्यामुळे आणि भाजपचे बळ इथे जास्त असल्याने नाशिक पक्षाकडे राहायला हवे, ही भावना आता अधिक बळावली आहे.
Hemant Godse, Vijay Karanjkar and BJP
Hemant Godse, Vijay Karanjkar and BJPesakal
Updated on

नाशिक : शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार, नेते श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचे आवाहन करत त्यांच्या उमेदवारीची घोषणा करून टाकली. (Nashik Lok Sabha Election 2024) त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. त्यानंतर गोडसे यांनी आधीच सुरू केलेल्या प्रचाराचा वेग आणखी वाढवला. त्यानंतरही भाजपने दबावतंत्राचा वापर सुरू ठेवला आहे. (Nashik political Lok Sabha Election 2024 marathi news)(latest marathi news)

विद्यमान खासदारांबद्दल सर्व स्तरात नाराजी असल्यामुळे आणि भाजपचे बळ इथे जास्त असल्याने नाशिक पक्षाकडे राहायला हवे, ही भावना आता अधिक बळावली आहे. या सगळ्या धामधुमीत गोड (से) मानून घ्या! अशी भावना शिंदे सेनेचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.

श्रीकांत शिंदे यांनी अत्यंत चतुराईने गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा करून भाजपची कोंडी केली. शिवसेनेकडून ही घोषणा ठरवून झालेली आहे. भाजपकडून काही काळापासून नाशिकवर हक्क सांगितला जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेची ही एकमेव जागा पक्षाकडे राहावी, या रणनीतीतून श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेकडे पाहायला हवे. 

भाजपचे तीन आमदार नाशिक लोकसभा मतदारसंघात असल्याने भाजपने या जागेवर सांगितलेला दावा चुकीचा नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बळावर हेमंत गोडसे यांचा गेल्यावेळी विजय सुकर झाला होता. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. दोन टर्म झाल्यामुळे नाराजीचा सूर अधिक आहे.

प्रत्यक्ष शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही फार उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही. त्यामुळे अजूनही जोर लावला तर जागा भाजपकडे येऊ शकते, असा भाजप नेत्यांचा कयास आहे. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी पूर्ण समजून उमजून घोषणा केल्यामुळे शिंदे सेनेकडे ही जागा राहील, असे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (latest marathi news)

Hemant Godse, Vijay Karanjkar and BJP
Sangli Loksabha : 'शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा, अन्यथा आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल'; विश्‍वजित कदमांचा थेट इशारा

जर जागा शिंदे सेनेकडेच राहिल्यास भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काम करण्यास नाखूश असतील, हा मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे शिंदे सेनेतही धास्ती आहे. मोदींना पुन्हा आसनस्थ करण्यासाठी भाजप कुठल्याही स्थितीत काम करेलच, असा अतिआत्मविश्वास गोडसे बाळगून आहेत.

...अन् करंजकर लागले कामाला

दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मात्र गोडसे यांच्या घोषणेनंतर आनंदाची भावना आहे. ठाकरे गटाचे विजय करंजकर कामाला लागले आहेत. तथापि, सोपा भिडू समजून महाविकास आघाडीचे विरोधक निश्चिंत दिसून येतात. आम्हाला हवे असलेले विरोधक लाभले आणि आत्तापासून विजय निश्चित झाल्याचा सूर शिंदे सेना गटातून उमटताना दिसून येतो.

Hemant Godse, Vijay Karanjkar and BJP
Satara Loksabha : भाजपनं उदयनराजेंचं तिकीट कापलं? महाजन म्हणाले, 'राजेंनी तिकीट मागण्याची गरज नाही..'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.