Nashik MNS News: सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेची नाशिकमधून तुतारी! महिला दिनी राज ठाकरेंच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात आरती

Political News : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी केली आहे.
MNS Raj Thackeray
MNS Raj Thackerayesakal
Updated on

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्या तयारीचा भाग म्हणून भाजप व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नाशिकमध्ये अधिवेशन घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. ९ मार्चला हा मेळावा होणार असून त्यापूर्वी आठ मार्चला राज ठाकरे हे श्री काळाराम मंदिरात आरती करतील. (Nashik political MNS Raj Thackeray marathi news )

१२ जानेवारीला नाशिकमध्ये युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कार्यक्रम झाला. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून युवकांना संबोधित केले. त्याचबरोबर श्री काळाराम मंदिरात राम आरती केली व गोदावरी पूजनही त्यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रॅली काढली. राष्ट्रीय युवा दिनाचे निमित्त असले तरी पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक भेटीकडे राजकीय अंगाने अधिक पाहिले गेले.

भाजपच्या या इव्हेंटनंतर शिवसेनेच्या उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेचा राज्यस्तरीय मेळावा झाला. मेळाव्याच्या निमित्ताने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य जाहीर सभाही झाली. या जाहीर सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनीही निवडणुकीचे रणसिंग फुंकले. त्यांच्या भाषणात निवडणुकीचा प्रचार अधिक दिसून आला.

उद्धव ठाकरे यांच्या नाशिक भेटीनंतर मुख्यमंत्री व शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही नाशिकमध्ये दोनदा भेटी दिल्या. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकून कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्याचा व गटबाजी सोडून देण्याचा बूस्टर डोस दिला.

राजकीय अधिवेशन व मेळाव्याच्या माध्यमातून आता मनसेने देखील नाशिकच्या मैदानाची निवड केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर नाशिकने मनसेला साथ दिली. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरामधून मनसेचे तीन आमदार निवडून दिले.

त्यानंतर सन २०१२ मध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून दिले. त्यांच्या बळावर मनसेची राज्यात प्रथमच महापालिकेत सत्ता आली. पाच वर्षांत मनसेने सत्ता गाजविल्यानंतर भाजपच्या लाटेमध्ये सर्वच पक्ष भुईसपाट झाले. त्यात मनसेचाही समावेश होता. त्यानंतर मनसेला हवी तशी उभारी मिळालेली नाही. (Latest Marathi News)

MNS Raj Thackeray
Nashik Political: आदिवासी आमदारांमधील वाद थेट पक्षश्रेष्ठींसमोर! पक्षासमोर आर्थिक वादावरून गटबाजीचे नवीन आव्हान

मनसेचा उभारी घेण्याचा प्रयत्न

एकेकाळी मनसेचा नाशिक हा बालेकिल्ला राहिला. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक मधूनच निवडणुकीची तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. सात, आठ, नऊ मार्च असे तीन दिवस मनसेचे भरगच्च कार्यक्रम होतील.

सात मार्चला पक्षाचे प्रमुख राज ठाकरे नाशिकमध्ये येतील. आठ मार्चला सकाळी मनसेत काही प्रवेश होतील. त्यानंतर नऊ मार्चला दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाचा राज्यव्यापी मेळावा होईल. पक्षाचे राज्यभरातील प्रमुख नेते मेळाव्याला उपस्थित राहतील.

काळाराम मंदिर पुन्हा चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये १२ जानेवारीला श्री काळाराम मंदिरात आरती झाली. त्यानंतर २२ जानेवारीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसमवेत श्री काळाराम मंदिरात आरती केली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही काळारामाची आरती केली. आता राज ठाकरे आठ मार्चला संध्याकाळी मंदिरात आरती करणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा राम मंदिर आरती चर्चेत येणार आहे.

MNS Raj Thackeray
Kalyan Politics: आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.