Nashik MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या हस्ते शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात महाआरती होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे स्वागत करणारे बॅनर्स मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात झळकले आहेत.
मात्र काही लोकांनी बॅनर फाडल्याने मनसे अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे, परंतु दुसरीकडे एकाच व्यक्तीचे बॅनर फाडल्याने मनसे अंतर्गत बंडाळे असल्याचे मानले जात आहे. जुन्या लोकांना डावलून नव्याने काही लोकांना पक्षांतर्गत मोठ्या पदांवर चाल दिल्याने त्यातून बंडाळी झाल्याचे बोलले जात आहे. (Nashik political MNS Raj Thackeray welcome banner torn marathi news)
मनसेचा १८ व्या वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा होत असून यानिमित्त नाशिकमध्ये मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राज ठाकरे हे आज सायंकाळी नाशिकला येणार आहे.
शुक्रवार ता.०८ रोजी सकाळी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देऊन महाआरती करणार आहे. यानिमित्त काळाराम मंदिर परिसरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागताचे फलकबाजी करण्यात आली आहे.
मात्र, मध्यरात्री सुमारास अज्ञातानी यातील काही फलक फाडल्याचा प्रकार घडला. फलक कोणी आणि का फाडले ? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी फलक संदर्भात माहिती घेणे कामी बोलवण्यात आले आहे. तसेच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असून अधिक तपास पोलीस करीत आहे. (Latest Marathi News)
फलक अधिकृत की अनधिकृत?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. मात्र बॅनर लावताना महापालिकेची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याची बाब देखील समोर येत आहे. त्यामुळे पाडण्यात आलेले बॅनर हे अधिकृत होते की अनधिकृत, याबद्दल देखील चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.