चांदोरी : चांदोरी गावातील प्रमुख संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चांदोरी येथील साईनाथ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्थेचे राजकारण निवडणुकीपूर्वीच विक्रमी अर्ज दाखल झाल्याने तापले होते. माघारी प्रसंगी घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे अनेकांना इच्छा असून माघार घेता न आल्याने नंतर उमेदवारी कायम असल्याने पतसंस्थेची निवडणूक येथे लक्षवेधी झाली. (Nashik Political Sainath Credit Union five year election)
चांदोरी येथील साईनाथ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्थेच्या शनिवार दिनांक ६ जून रोजी सकाळी ८ ते ४ यावेळेत मतदान झाल्यानंतर लगेचच संध्याकाळी पडलेल्या मतमोजणीमध्ये निकाल जाहीर झालेत आहे. ग्रामीण भागातील राजकारणात पतसंस्था खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. साईनाथ पतसंस्थेच्या मतमोजणीला संपन्न होत असतांना वाढणारी उत्कंठा, उमेदवार अन कार्यकर्त्यांची धाकधूक कमी जास्त होणारी दिसली.
झालेल्या मतदानात एकूण १०९३ मतापैकी ९२६ मतदान ८६.३०% झाले.माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे,शिरीष गडाख, अनिल भोर, संतोष विसपुते,सुनील गायखे यांच्या नेतृत्वाखाली आपला पॅनलला ४ तर विरोधी माजी सरपंच दत्तात्रय गडाख, निवृत्ती आहेर, शरद नाठे, विनायक खरात, संदीप गडाख, गणेश नाठे, राजेंद्र हिरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री साई गणेश परिवर्तन पॅनलला ७ जागा प्राप्त झाल्या. (latest marathi news)
आपला पॅनलचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पाटील गडाख व अतुल पेखळे यांना समसमान ४०६ मते पडल्याने चिठी तुन अतुल पेखळे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कैलास सोनवणे यांनी काम बघितले, तर सायखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत सैंदाने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विजयी उमेदवार
श्री साई गणेश परिवर्तन पॅनल
श्री भास्कर उमाजी आहेर (४१९)
संजय काशिनाथ खरात (४२४)
सचिन अरुण गडाख (४६४)
बाळासाहेब रघुनाथ टर्ले (४१०)
रामदास सखाराम शेटे (४२८)
सरस्वती सुभाष कोटमे (५१९)
भाऊसाहेब खंडू जाधव (४८७)
आपला पॅनल
अतुल शेखर पेखळे (४०६)
योगेश हनुमंत जाधव (४५३)
शैला संजय गायखे (४९७)
प्रकाश वामन पगारे (५०६)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.