चांदवड : चांदवड तालुका शिवसेनेच्या (शिंदे गट) संपूर्ण कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर तालुक्यात नव्याने संघटन उभारणाऱ्या विकास भुजाडे यांचे तालुकाप्रमुख पद काढून घेतल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पदांचे सामूहिक राजीनामे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्याकडे दिले आहेत. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. (Shiv Sena loss Chandwad taluka Mass resignation of office bearers)