Niphad Vidhan Sabha 2024: निफाडमध्ये अनिल कदमांच्या वाटेतले काटे कोण?

Political News : ही लढत गेल्या पंधरा वर्षांपासून पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्यात होणार असे चित्र आहे.
MLA Dilip Bankar, Anil Kadam, Yatin Kadam, Balasaheb Kshirsagar.
MLA Dilip Bankar, Anil Kadam, Yatin Kadam, Balasaheb Kshirsagar.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्याच्या शिक्षण, सहकाराबरोबरच राजकारणाचा दबादबा असलेल्या निफाड मतदारसंघात यंदा विधानसभेची ‘न भुतो...’ अशी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. ही लढत गेल्या पंधरा वर्षांपासून पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्यात होणार असे चित्र आहे.

पण, गेल्यावेळच्या निवडणुकीत जय-पराजयाला कारणीभूत ठरलेल्या यतीन कदम यांनी पुन्हा शड्डु ठोकला आहे. तर मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समितीचे माजी उपसभापती गुरूदेव कांदे यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे यंदाची लढत काट्याची अन् तिरंगी-चौरंगी होण्याची चिन्ह दिसत आहे. (Nashik political vidhansabha election line up begins in Niphad)

कदम यांना वातावरण अनुकुल पण...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून भलतेच फॉर्ममध्ये असलेले शिवसेनेचे अनिल कदम यांना वातावरण अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रचार त्यांच्या पथ्यावर पडू शकतो. कारण, शरद पवार व कॉंग्रेस समर्थकांबरोबरच आमदार बनकर यांचे काही समर्थक कदम यांच्या संपर्कात आले आहेत.

कदम यांची समीकरणे जुळत असली तरी त्यांच्या वाटेत अनेक काटे अद्याप आहेत. आमदार बनकर हे अजित पवार गटाबरोबर गेले असले तरी निफाड विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने निफाडवर राष्ट्रवादीचा मजबूत दावा ठोकला आहे.

शरद पवार यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेचीही तुतारी चितेगाव (ता. निफाड) येथे मेळावा घेत फुंकली आहे. राजेंद्र मोगल, तालुकाध्यक्ष दिलीप मोरे यांची नावे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चर्चेत आली आहेत. कदम यांना राष्ट्रवादीचा दावा थोपवितांना शरद पवार समर्थकांना सोबत घेण्याची कसरत करावी लागेल.

याशिवाय तालुका पिंजून काढणारे त्यांचे चुलत बंधू यतीन कदम यांच्यामुळे पूर्वीप्रमाणे होणारी मतविभागणी रोखण्याचे आव्हान अनिल कदम यांच्यापुढे आहे. दुरावलेल्यांना पुन्हा जोडण्याचे कौशल्य दाखविल्यास निफाडमध्ये मशाल पेटू शकते.

MLA Dilip Bankar, Anil Kadam, Yatin Kadam, Balasaheb Kshirsagar.
Manoj Jarange news निवडणूक लढवणार, मतदारसंघांची माहितीही मागवली । Vidhan sabha election । politics । Maratha reservation ।

आमदार बनकर यांच्यासाठी आव्हानात्मक स्थिती

सलग दोनदा पराभूत होऊनही निफाडच्या राजकीय पटलावर खंबीरपणे उभे राहिलेले दिलीप बनकर यांनी गेल्या निवडणुकीत अनिल कदम यांना पराभवाचा दे धक्का दिला. संयमाने वाटचाल करीत शांतीत क्रांती करण्याचा आमदार बनकर यांचा स्वभाव आहे. सत्तेत सहभागी होताच दीड हजार कोटी रूपयांची विकासकामे निफाड मतदारसंघात आणण्याची किमया आमदार बनकर यांनी केली.

पण, शरद पवार यांची साथ सोडणे त्यांच्याही काही समर्थकांना रूचले नाही. यातून काही कार्यकर्ते आयतेच कदम यांना जाऊन मिळाले आहे. महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटणार असल्याने दिलीप बनकर हेच पुन्हा उमेदवार असतील. यात घटकपक्ष भाजपच्या मतदारांना आपलेसे करण्याचे कौशल्य आमदार बनकर यांना दाखवावे लागेल.

यतीन कदम यांची उमेदवारी मतविभागणीमुळे आमदार बनकर यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्ह आहे. आमदार बनकर यांना गोदाकाठ परिसरात मोठा जनाधार आहे. याचा प्रत्यय गेल्या विधानसभा निवडणुकीबरोबरच नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत आला. ती व्होटबँक कायम असल्याचे नुकत्याच आमदार बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या गर्दीवरून दिसली. (latest marathi news)

MLA Dilip Bankar, Anil Kadam, Yatin Kadam, Balasaheb Kshirsagar.
Nashik Vidhan Sabha Election 2024 : नाशिककरांचा कौल कोणाला मिळणार?

यतीन कदम, बाळासाहेब क्षीरसागर यांना हवी पक्षाची उमेदवारी

माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. गावागावात जात ‘होम टु होम’ त्यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या. कदम घराण्याचा राजकीय वारसा अन् भाजपच्या कार्यकर्त्यांची पाठीशी असलेली ताकद ही त्यांची जमेची बाजू आहे.

पण, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला जाण्याची चिन्हे अधिक असल्याने यतीन कदम यांना अपक्ष लढण्याशिवाय पर्याय दिसत नाही. पक्षाचा बॅनर पाठीशी नसेल तर किती मर्यादा येतात, याचा अनुभव त्यांनी गेल्या निवडणुकीत घेतला आहे.

मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांचा गेल्या चार वर्षात राजकीय आलेख चढता राहिला आहे. त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांना धुमारे फुटले असून, विधानसभेच्या रिंगणात ते उतरू पाहत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा पाहता नुकतीच त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.

क्षीरसागर यांची उमेदवारी झाल्यास निफाड परिसरातील व्होटबँक ते एकतर्फी खेचू शकतात. गुरूदेव कांदे यांनीही ‘लक्ष्य विधानसभा’ असे बॅनर झळकविल्याने ते चर्चेत आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीने निफाडचे राजकारण गतीमान झाले आहे. निफाडमध्ये भाकरी फिरणार की पुन्हा बनकर येणार याची चर्चा आता होत आहे.

MLA Dilip Bankar, Anil Kadam, Yatin Kadam, Balasaheb Kshirsagar.
Nashik Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीपूर्वीच आघाडी, युतीमध्ये जागेवरून तंटे! घटक पक्षांबरोबरच पक्षांतर्गत कुरबुरींचा सामना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.