नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी बुधवारी (ता. २०) निफाड मतदारसंघातील ओझर टाउनशिप येथे रात्री साडेदहापर्यंत मतदान सुरू राहिले. मनमाड शहरात ९.५० पर्यंत मतदान चालले. मतदान झाल्यावर येथील मतपेट्या ‘सील’ करून मतमोजणीच्या ठिकाणी जमा करण्यात आल्या.
जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील मतपेट्या मध्यरात्री प्राप्त झाल्या. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांतील दुर्गम भागातील मतपेट्या थेट नाशिकला येण्यासाठी पहाटेचे तीन झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.