Nashik Pomegranate : तालुक्यासह कसमादेतील हमीपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंबाला बदलत्या वातावरणाचा फटका बसू लागला आहे. पावसामुळे आद्रता वाढली आहे. परिणामी, अनेक बागांमध्ये डाळिंबावर तेल्याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. असे असले तरी डाळिंबाचे भाव टिकून आहेत. सध्या बाजारात लेट हस्त बहाराचा डाळिंब येत आहे. भाव ७० ते १०० रुपया दरम्यान आहेत. कसमादेत ३० ते ३५ हजार एकरवर डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे. (Pomegranate hit by changing environment price is sustained)
गेल्या पाच वर्षापासून डाळिंब शेतकऱ्यांना साथ देत आहे. शेतीमाल व फळपिकांचे भाव अनेकदा गडगडले. डाळिंब मात्र खंबीरपणे बळीराजाच्या मागे उभा आहे. एकीकडे फळाला भाव मिळत असला तरी डाळिंबावर वाढत असलेल्या तेल्या रोगाचा प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत आहे. पाच वर्षापुर्वी कसमादेतून तेल्या रोग हद्दपार झाला होता. परिणामी, डाळिंबाचे क्षेत्रही वाढले होते.
दोन वर्षापासून तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या या रोगाने अनेक डाळिंबा बागांना घेरले आहे.यावर्षी कसमादेत कडक ऊन पडले. पावसाळ्यात अचानक वातावरण बदलले. काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. जास्त पाऊस झालेल्या भागात आर्द्रता वाढल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कसमादेतील बहुतांशी शेतकऱ्यांनी आंबे बहार धरला आहे. (latest marathi news)
खरीपाचे उत्पन्न व कांद्याचे कमी-अधिक भाव यामुळे डाळींबच भरोवशाचे पीक झाले आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शेतकरी फवारण्या व उपाययोजना करीत आहेत. सध्या बाजारात डाळींबाचे भाव शंभर रुपयापर्यंत आहे. लेट हस्त बहारातील माल बाजारात येत आहे. तेल्या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिल्यास आंबे बहाराचे चांगले उत्पन्न येईल, असा कृषी अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
''ज्या भागात जास्त पाऊस झाला तेथे आद्रता वाढल्याने तेल्या रोगाचा प्रादुर्भाव डाळिंबावर होत आहे. काही ठिकाणी फळकुज देखील होत आहे. शेतकऱ्यांनी फवारण्या वेळेवर कराव्यात. बागेची निगा राखावी. आगामी काळात आणखी मुसळधार पाऊस होवू शकतो. रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्यावी.''- अरुण देवरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.