मालेगाव : कसमादे डाळिंबाचे माहेरघर आहे. गेल्या वर्षाची दुष्काळी परिस्थिती व तेल्या रोगाचा पिकावरील वाढत्या प्रादुर्भावामुळे डाळिंब अडचणीत आला आहे. असे असताना परिस्थितीवर मात करीत सातमाने (ता. मालेगाव) येथील युवा शेतकरी निलेश पवार यांनी बागेची योग्य काळजी घेत निर्यातक्षम डाळिंब उत्पादित केला.
त्यांच्या डाळिंबाला आजवरचा सर्वोच्च २११ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे. श्री. पवार यांचे डाळिंब मलेशिया व श्रीलंकेत भाव खात आहे. त्यांची बाग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येत असून त्यांच्याकडून पीक व तेल्या रोगाला अटकाव घालण्याबाबत माहिती जाणून घेत आहेत. (Pomegranate of satmane gone abroad 211 per kg rate)