Nashik News : आदिवासी विकास विभागाने परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी असलेली वेळखाऊ प्रक्रीया लक्षात घेऊन विभागाने परदेशी शिष्यवृत्तीसाठी पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होऊन लाभार्थी विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती मिळणार आहे. सन २००३-४ या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विदेशातील उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. (Portal from Tribal Department for Foreign Scholarships)