Nashik News : रेड सिग्नल असूनही वाहने सुसाट; आडगाव नाक्यावर मोठ्या अपघाताची शक्यता

Nashik : वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून जुन्या आडगाव नाक्यावर वाहतूक सिग्नल कार्यान्वित झाला आहे.
Traffic Signal (file photo)
Traffic Signal (file photo)esakal
Updated on

Nashik News : वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून जुन्या आडगाव नाक्यावर वाहतूक सिग्नल कार्यान्वित झाला आहे. परंतु सुरवातीपासूनच येथील सिग्नल यंत्रणेचा बोऱ्या वाजला असून तो चालू असो वा बंद सर्वच प्रकारची वाहने सुसाट धावतात. सिग्नल यंत्रणेला काही रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारही जुमानत नसल्याने याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता वाढली आहे. जुन्या आडगाव नाक्यावरील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. (nashik possibility of major accidents has increased at adgaon naka due break signal marathi news)

मात्र अनेक दुचाकीचालक सिग्नल चालू असो वा बंद थांबण्याच्या मानसिकतेत नसतात. यामुळे येथून वाहने काढणे अनेकांसाठी जिकिरीचे झाले आहे. महिला व ज्येष्ठांना याचा मोठा मनस्ताप होतो. याठिकाणी अनेकवेळा वाहतूक शाखेचा कर्मचारी हजर नसतो, याचाही अनेकजण गैरफायदा घेतात.

हिरावाडीत मोठी वस्ती

हिरावाडी रोडकडून मुंबई-आग्रा महामार्ग, म्हसरूळकडे जाणाऱ्या मार्गासाठी कनेक्टिव्हिटी असल्याने अनेक नववसाहती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वर्दळही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पाच-सात वर्षांपूर्वी तुरळक वाहतूक असलेल्या या रस्त्यावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे.

ही सर्व वाहने येथूनच मार्गक्रमण करतात. येथून जवळच मुंबई-आग्रा महामार्गही आहे. शिवाय महात्मा गांधी विद्यामंदिर, के. के. वाघ शैक्षणिक संकुल, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव मेडिकल कॉलेजही आहे. तेथील विद्यार्थी येथूनच ये-जा करतात. महामार्गाच्या दुतर्फा नागरी वस्तीही वाढली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोठी वर्दळ असते.

Traffic Signal (file photo)
Nashik Crime News : अंबडमध्ये घरात सापडला गांजाचा साठा; संशयिताला अटक

सिग्नलबाबत गोंधळ

पंचवटीकडून येणारी वाहने तसेच गणेशवाडीकडून येणाऱ्या वाहनांसाठी हिरावाडी तसेच नवीन आडगाव नाक्याकडे जाण्यासाठी स्वतंत्र सिग्नल आहे. परंतु त्याबाबत अनेक वाहनधारकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे आपला सिग्नल सुरू झाल्याच्या गैरसमजातून नवखे वाहनधारक वाहने सुरू करतात.

उड्डाणपुलाची आवश्‍यकता

जुन्या आडगाव नाक्यावर अनेक रस्ते एकत्र येतात. रात्री उशिरापर्यंत या चौकात वाहनधारकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. त्यामुळे येथे सिग्नल यंत्रणेऐवजी उड्डाणपूल झाल्यास पंचवटी कारंजाकडून येणारी वाहने थेट पलिकडे जाऊ शकतील, त्यामुळे वाहतूक कोंडीही टळू शकेल.

''मोठ्या वर्दळीमुळे आडगाव नाक्यावरील सिग्नलचा कालावधी अधिक आहे. त्यामुळे घाईत असलेले अनेक दुचाकीधारक यंत्रणेला जुमानत नाहीत. याठिकाणी उड्डाणपूल झाल्यावर कोंडीवर तोडगा निघेल.''- अभिजित राऊत, अध्यक्ष, पंचवटी युवक समिती.

Traffic Signal (file photo)
Nashik News : अद्याप 2 हजार परवानाधारकांच्या पिस्तुलांची प्रतीक्षा; नाशिक परीक्षेत्रातील चित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.