Nashik News : नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या नाशिक रोड बसस्थानकातील मोठे, मोठे खड्डे दुरुस्तीच्या कामाला राज्य परिवहन मंडळाने अखेर सुरवात केली आहे. या समस्यांबाबत ‘सकाळ’ ने वेळोवेळी वाचा फोडली होती. सकाळच्या वृत्तानंतर दुरुस्ती कामास सुरवात झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त करून ‘सकाळ’ चे आभार मानले आहे. (Pothole repair work started in bus station nashikroad)
दरम्यान, रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष गौतम सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब गांगुर्डे, संपत जाधव, माजी नगरसेवक कैलास पगारे, कैलास तिवारे आदींनी पाठपुरावा केला होता. १५ ऑगस्टपर्यंत नाशिक रोड बसस्थानकाच्या खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास बसस्थानकाच्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघाने दिला होता.
नाशिक रोड बसस्थानकाच्या आवारातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने बस व एसटी गाड्या आत आणणे दिव्यच झाले होते. पावसाचे पाणी साचल्याने रोगराई पसरू लागली होती. स्थानकात खड्डेच खड्डे झाल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढणे व उतरणे अवघड झाले होते. वयोवृद्ध, दिव्यांग प्रवासी, विद्यार्थी, लहान मुले यांचे हाल होत होते. (latest marathi news)
खड्ड्यांमुळे वयोवृद्ध पडून जखमी झाल्याच्या घटनाही येथे घडल्या. बसस्थानकात प्रवेश करतेवेळी बसमधील प्रवाशांना जोरदार धक्के बसत होते. देशभरातून भाविक रेल्वेने नाशिक रोडला दाखल झाल्यावर नाशिकमध्ये बसने जाण्याकरिता बसस्थानकात आल्यावर स्थानक दुरवस्थेचे वाईट चित्र अनुभवत होते.
रेल्वे संघाने परिवहन महामंडळ विभाग नियंत्रण अधिकारी यांना निवेदन दिले होते. बसस्थानकातील खड्ड्यात बसून आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. अखेर वृत्तानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत स्थानकातील रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले. दर्जेदार काम करावे, सर्व खड्डे दुरुस्त करावेत, अशी मागणी गौतम सोनवणे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.