Sinnar MIDC Problems : औद्योगिक वसाहत की धुळीचा कारखाना? डांबरीकरणाच्‍या 6 महिन्‍यातच मुख्य रस्‍त्‍यावर खड्डे

Nashik : महामार्गावरून गावात प्रवेश करणाऱ्या रस्‍त्‍यावर खड्ड्यांमुळे आपसूक वाहनाला ब्रेक लागतो. अन्‌ डोळ्यासमोर दिसणारे कचऱ्याचे ढिग किळसवाणे वाटतात.
Workers plug potholes in the expanding Sinnar Industrial Estate.
Workers plug potholes in the expanding Sinnar Industrial Estate.esakal
Updated on

सिन्नर : महामार्गावरून गावात प्रवेश करणाऱ्या रस्‍त्‍यावर खड्ड्यांमुळे आपसूक वाहनाला ब्रेक लागतो. अन्‌ डोळ्यासमोर दिसणारे कचऱ्याचे ढिग किळसवाणे वाटतात. माळेगाव औद्योगिक वसाहतीत प्रवेश करताच हृदयद्रावक प्रवास सुरु होतो. खड्ड्यात असलेल्‍या रस्‍त्‍यातून वाहन चालवितांना वाहनावरील ताबा कधीही सुटण्याची भीती असते. मुख्य रस्‍त्‍याच्‍या डांबरीकरणनंतर अवघ्या सहा महिन्‍यात खड्ड्यांचे साम्राज्‍य पसरले. अंतर्गत रस्‍त्‍यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे. (Potholes on main road within 6 months of asphalting of industrial estate or dust factory)

औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांपासून सर्वसामान्‍य कर्मचारी रोजच किती यातना भोगत आहेत, त्‍याची प्रचिती 'सकाळ'ने केलेल्‍या पाहणीत आली. धूळधाण इतकी की काही मिनिटांसाठी औद्योगिक वसाहतीत दुचाकीवर फिरल्‍यास चेहरा संपूर्ण धुळीने माखेल. परंतु रोढावलेल्‍या यंत्रणेला मात्र याची तसूभरही चिंता नसल्‍याने, वर्षानुवर्षे औद्योगिक वसाहतीच्‍या समस्‍या 'जैसे थे' आहेत. मुख्य रस्‍त्‍यावर ठिकठिकाणी खड्डे, तर अंतर्गत रस्‍तेच संपूर्ण खड्डेमय झालेले आहेत. आधीच या भागात अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. या वाहनांची कारखान्‍यांपर्यंत पोहचतांना तारांबळ होताना दिसते. (क्रमश:)

औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या रस्‍त्‍याची प्रतीक्षा

माळेगाव व मुसळगाव या दोन्‍ही वसाहतींना जोडणाऱ्या नवीन काँक्रिट ४५ मीटर रुंद चौपदरी बाह्य वळण रस्‍त्‍यांची प्रतीक्षा कायम आहे. संबंधित क्षेत्र औद्योगिक क्षेत्राबाहेर असल्‍याने उद्योग मंत्र्यांची परवानगी आवश्‍यक असल्‍याचे सबब दिली जात असल्‍याने, प्रस्‍ताव प्रशासकीय मान्‍यतेच्‍या प्रतीक्षेत आहे.

परकीय पाहुण्यांना आणायचे कसे?

गुंतवणुकीस इच्छुक परकीय उद्योजक प्रकल्‍प भेटीसाठी उत्‍सुक असतात. परंतु रस्‍त्‍यांची दयनीय अवस्‍था असल्‍याने, दिग्‍गज उद्योजकांना आमंत्रित करायचे कसे, असा प्रश्‍न प्रकल्‍प प्रमुखांना पडतो आहे. व त्‍यामुळे कोट्यवधींची संभाव्‍य गुंतवणूकदेखील यामुळे रखडते आहे. (latest marathi news)

Workers plug potholes in the expanding Sinnar Industrial Estate.
Nashik Vidhan Sabha Election: कोणाचा पत्ता कट होणार? धाकधूक वाढली उमेदवारी न मिळाल्यास पक्षांतरासाठी इच्छुकांची फिल्डिंग

अशा आहेत समस्‍या..

- ३० किलोमीटर अंतराचे आहेत मुख्य व अंतर्गत रस्‍ते

- दुरुस्‍तीसाठी कोट्यवधी खर्चूनही रस्‍त्‍यात खड्ड्यांचे साम्राज्‍य

- साईड पट्ट्यांची अवस्‍था बिकट, रस्‍त्‍याच्‍या कडेला साचलेय कच

- पावसाळ्यात रस्‍त्‍यावरील पाणी थेट शिरते कंपन्‍यांमध्ये

- पावसाळ्यानंतर रस्‍त्‍यांचे वाढते प्रमाण

- रस्‍ते बांधणी व दुरुस्‍ती कामाच्‍या गुणवत्तेबाबत साशंकता

''माळेगाव औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्‍त्‍याला सहा महिन्‍यातच खड्डे पडले आहेत. अंतर्गत रस्‍त्‍यांची अवस्‍था दयनीय आहे. पावसाळ्यात तर आणखीच भयंकर परिस्‍थिती असते. औद्योगिक वसाहतींना जोडणार्या अंतर्गत रस्‍त्‍याचेही काम जलद गतीने होण्याची आवश्‍यकता आहे.''- बबन वाजे, सचिव, सिन्नर इंडस्ट्रिअल ॲण्ड मॅन्‍युफॅक्‍चरर्स असोसिएशन.

''माळेगाव औद्योगिक वसाहतीतील रस्‍त्‍यांच्‍या संदर्भात आयआयटी, मुंबईचे पथक सर्वेक्षण करणार आहे. त्‍यांनी सुचविलेल्‍या उपाययोजनांतून रस्‍त्‍यांचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यावर भर असेल. सध्यासाठी रस्‍त्‍यांची डागडुजी करण्यात येत आहे.''- पी. व्‍ही. चौधरी, उपअभियंता, एमआयडीसी.

Workers plug potholes in the expanding Sinnar Industrial Estate.
Nashik News : पंकज भुजबळांच्या रूपाने नाशिकला आमदार; मंत्री भुजबळांना वाढदिवसाचे ‘गिफ्ट’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.