Nashik News : थकबाकीदारांचा वीज पुरवठा होणार खंडित! पिंपळगाव महावितरणकडून वसुलीसाठी धडक मोहीम

Nashik News : थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडुन वीज पुरवठा खंडित करण्याचा शॉक दिला जात आहे.
Electricity supply cut
Electricity supply cutesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : वारंवार आवाहन करूनही वीजबिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांवर पिंपळगावच्या महावितरण (Mahavitaran) विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी थकबाकी जमा करण्याचे आवाहन करीत आहे. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडुन वीज पुरवठा खंडित करण्याचा शॉक दिला जात आहे. (Nashik Pimpalgaon Mahavitaran marathi news)

आर्थिक वर्ष संपण्यास अवघा सव्वा महिना बाकी आहे.त्यामुळे वीज देयक थकबाकीदारांच्या वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोड मध्ये आले आहे. वीजबील थकबाकी ४५ दिवसाच्या पुढे गेली तर महावितरणकडुन वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

थकबाकीचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने महावितरणने आता कठोर उपाययोजना आखल्या आहेत.कुठलीही तमा न बाळगता थकबाकीरांची वीजजोडणी खंडित केली जात असल्याने थकबाकीदारांनो...सावधान, असा इशारा महावितरणकडून दिला जात आहे. वीजबील वेळेत भरून कारवाई टाळा असे आवाहनही महावितरणकडून करण्यात येत आहे.

घरांवर करडी नजर

ज्या थकबाकीदारंची वीजखंडित करण्यात आली आहे. अशा थकबाकीदारांच्या वीजजोडणीची देखील स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. वीजखंडित केलेल्या घरांवर देखील पथकांची करडी नजर आहे. थकबाकीदारांने शेजारीकडुन अथवा इतर ठिकाणाहुन वीज पुरवठा घेतल्याचे निदर्शनास आल्यास थकबाकीदार व वीजपुरवठा करणाऱ्यावर विद्युत कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.

Electricity supply cut
Grain Storage: PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी सुरू केली जगातील सर्वात मोठी 'गोदाम योजना'; असा होणार लाभ

कोटी रुपयांची थकबाकी

पिंपळगाव बसवंत महावितरण कार्यालय अंतर्गत कृषी वगळता घरगुती व अन्य वर्गवारीतील ग्राहकांची संख्या सात हजाराच्या जवळपास आहे. त्यातील थकबाकीदारांनी १ कोटी १८ लाख रूपयांची थकबाकी वारंवार पाठपुरावा करूनही भरलेली नाही.

त्यामुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांची ब्लॅकलिस्ट बनविली असून सुमारे अनेक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दिवसेंदिवस ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे.

"नियमीत वीज न भरणाऱ्या वीज ग्राहकांना कटू कारवाईला सामोरे जावे लागत आहे.थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी थकीत रक्कम भरून अखंडित वीज पुरवठा घ्यावा."

-किसन कोपनार, कार्यकारी अभियंता, पिंपळगाव बसवंत).

Electricity supply cut
Nashik Water Crisis: धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट! दारणा 43 तर भावलीत 32 टक्के पाणीसाठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.