Nashik Power Cut : 86 गावांचा वीजपुरवठा राहणार 21 तास खंडित

Nashik Power Cut : पालखेड डाव्या कालव्यातून सोमवार (ता. २५)पासून सोडलेल्या आवर्तनातून येवला, मनमाडच्या पाणीयोजनासह निफाड, येवला, दिंडोरी तालुक्यांतील ५३ गावांतील बंधारे, तलाव भरून देण्यात येणार आहेत.
Power Cut
Power Cutesakal
Updated on

येवला : पालखेड डाव्या कालव्यातून सोमवार (ता. २५)पासून सोडलेल्या आवर्तनातून येवला, मनमाडच्या पाणीयोजनासह निफाड, येवला, दिंडोरी तालुक्यांतील ५३ गावांतील बंधारे, तलाव भरून देण्यात येणार आहेत. सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीत पाणी चोरी टाळण्यासाठी पालखेडलगतच्या तिन्ही तालुक्यांतील ८६ गावांचा वीजपुरवठा रोज तब्बल २१ तास खंडित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.(Nashik Power supply to 86 villages will be interrupted for 21 hours)

पालखेड डाव्या कालव्यावरील पाणीयोजनांचे साठवण तलाव कोरडे झाल्याने येवल्यास मनमाडवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने पालखेड पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सोमवारपासून बिगरसिंचन आवर्तन सोडले. ९ एप्रिलपर्यंत आवर्तन सुरू राहणार आहे.

येवला शहर, ३८ गाव पाणीयोजना आणि मनमाड शहर व मनमाड मध्य रेल्वे या चार योजनांचे तलाव भरून देण्यासाठी ३३० दक्षलक्ष घनफूट, तर आकस्मिक आरक्षणावरील गावांतील बंधारे व साठवण तलावात पाणी देण्यासाठी १०५५ दक्षलक्ष घनफूट पाणी पालखेड डाव्या कालव्यात सोडले आहे. या पाण्याने मनमाड, येवल्याच्या योजनांचे दोन्ही तलाव.

दिंडोरी तालुक्यातील पालखेड जलाशयातून मातेरेवाडी, अवनखेड, पालखेड बंधारा, खडक सुकेणे, कुर्णोली, लोखंडेवाडी, जोपूळ व चिंचखेड या गावांना ४३ दक्षलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे. निफाड तालुक्यातील कादवा नदीवरील साकोरे, उंबरखेड, कोकणगाव, शिरसगाव, बेहेड, नारायणटेंभी, वडाळी नजीक, कारसूळ, रौळसपिंप्री, कुंदेवाडी. (latest marathi news)

Power Cut
Nashik NMC News : अतिरिक्त FSI ने नगररचना विभागाला तारले! 241 कोटींचा महसुल जमा

पालखेड डाव्या कालव्यावरील बाजार समिती पिंपळगाव बसवंत, आहेरगाव, लोणवाडी, दावचवाडी, पंचकेश्वर, देवपूर, कुंभारी, नांदुर्डी, शिवडी, उगाव, खेड, वनसगाव व गोई नदीवरील पाचोरे खुर्द व बुद्रुक, मरळगोई खुर्द व बुद्रुक, गोंदेगाव, गोळेगाव व वाहेगाव या गावांसाठी ५२४ दक्षलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे.

येवला तालुक्यातील पाटोदा, रायते, बल्हेगाव, पिंपरी, कोटमगाव खुर्द, पिंपरी, शेवगे, सातारे, जऊळके, भाटगाव, नागडे, मातुलठाण व बोकटे या गावांसाठी ४८८ दक्षलक्ष घनफूट, असे एकूण १०५५ दक्षलक्ष घनफूट पिण्याचे पाणी मिळणार आहे. ९ एप्रिलपर्यंत पालखेड डावा कालवा, कादवा नदी व गोई नदीकाठावरील अनधिकृत पाणी उपसा टाळण्यासाठी रोज सकाळी ७ ते १० हा कालावधी वगळून रोज २१ तास वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दिंडोरीतील पालखेड डाव्या कालव्यावरील करंजवण, लखमापूर, म्हेळुस्के, ओझे, आवनखेड, परमोरी, राजापूर, पालखेड (बं), जोपूळ, लोखंडेवाडी, चिंचखेड व पालखेड फुगवट्यातील गावे, निफाडमधील उंबरखेड, पिंपळगाव ब., आहेरगाव, लोणवाडी, पालखेड मी. कारसूळ, दावचवाडी, देवपूर, पंचकेश्वर, रौळसपिंप्री, उगाव, खेडे, शिवडी, नांदुर्डी, रानवड, ब्राह्मणगाव, कुंदेवाडी, खडकमाळेगाव, सारोळे, कोटमगाव, वनसगाव.

Power Cut
Nashik Vegetables Rate Hike : पालेभाज्या, फळभाज्यांना आला ‘भाव’! उन्हामुळे आवक घटत चालल्याचा परिणाम

सोनेवाडी खुर्द व बुद्रुक, रामपूर, नैताळे, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव वीर, डोंगरगाव, विष्णूनगर, हनुमानगर, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, कोटमगाव, लासलगाव, मरळगोई खुर्द व बुद्रुक, गोंदेगाव, शिवापूर, पाचोरा बुद्रुक व खुर्द, येवल्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने बुद्रुक, मुखेड.

सोमठाणे, जळगाव (ने.), निळखेडे, लौकी, शिरसगाव, वळदगाव, पाटोदा, दहेगाव, ठाणगाव, पिंप्री, मुरमी, आडगाव, धुळगाव, अंतरवेली, धानोरे, नांदुर, बाभुळगाव खुर्द व बुद्रुक, बल्हेगाव, भाटगाव, नगरसूल, धामणगाव, सायगाव व अंदरसूल येथील वीजपुरवठा खंडित होणार आहे.

पोलिस बंदोबस्तात पाणी

आवर्तनातील पिण्याचे पाणी शेवटच्या गावांपर्यंत पोचविण्याचे जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. वीजमोटारी व डोंगळे टाकून पाणी चोरी होत असल्याने आवर्तन काळात पोलिस बंदोबस्तासह राज्य राखीव दलाची तुकडी देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे.

Power Cut
Nashik Success Story : शेतकऱ्याचा मुलगा बनला विस्तार अधिकारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.