Nashik News : पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलाचे काम युद्ध पातळीवर सुरू

Nashik News : औष्णिक वीज केंद्रातील १३२ के व्ही सब स्टेशनमधील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने रविवारी (ता.९) नाशिक शहरातील उपनगरांसह सुमारे ऐंशी गावांचा वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
Power transformer replacement work started
Power transformer replacement work startedesakal
Updated on

Nashik News : येथील औष्णिक वीज केंद्रातील १३२ के व्ही सब स्टेशनमधील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने रविवारी (ता.९) नाशिक शहरातील उपनगरांसह सुमारे ऐंशी गावांचा वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मंगळवारी (ता.११) सकाळी नवीन ट्रान्सफॉर्मर येथील वीज केंद्रात आणले गेले. ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून बुधवार (ता.१२) सकाळ पर्यंत एक ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम पूर्ण होईल. (Power transformer replacement work started at war level)

नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एक पॉवर ट्रान्सफॉर्मर सहा जूनच्या पावसाने तर रविवारी (ता.९) एकलहरे परिसरात सोसाट्याच्या वादळासह मुसळधार पावसाने प्रभावित होऊन रात्री दोन वाजता महापारेषण कंपनीच्या १३२ के व्ही उपकेंद्रातील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक रोड व आसपासच्या उपनगरासह सामनगाव, चांदोरी, शिंदे, नाशिक एक, नाशिक दोन आदी आठ सबस्टेशन अंतर्गत गावांचा वीज पुरवठा अठरा ते वीस तास खंडित झाला.

जळालेले पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम औष्णिक वीज केंद्रातील उपकेंद्रात सुरू असून बुधवारी (ता.१२) सकाळी एकाचे काम पूर्ण होऊन संध्याकाळपर्यंत आठही सब स्टेशन अंतर्गतच्या गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ ला सांगितले. (latest marathi news)

Power transformer replacement work started
Nashik Pre-Monsoon News : मॉन्सूनपूर्व पावसाने 6 व्यक्तींचा घेतला बळी! 1 हजार 563 घरांची पडझड

विजेअभावी नागरिक बेहाल

उर्वरित दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम टप्प्या टप्प्याने पूर्ण होणार आहे. वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंतीची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली. परवा रात्रीपासून खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी (ता.१०) सायंकाळ उशिरापर्यंत पूर्ववत झालेला नव्हता.

तर दोन तास या गावांना तर दोन तास दुसऱ्या गावात वा भागात जिथून वीज पुरवठा घेणे शक्य आहे, असे आडगाव, टाकळी, अंबड, नायगाव या सब स्टेशनवरून वीज पुरवठा घेऊन ग्रामीण भागासह शहरी भागात वीज पुरवठा कंपनी कडून सुरू आहे. पंचक्रोशी सह आजूबाजूच्या गावांचा वीज पुरवठा खंडितमुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, मोबाईल चार्जिंग न करू शकणे, फ्रिज, पंखे, कुलर बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

Power transformer replacement work started
Nashik News : एअरलाईन्सचा गलथानपणा! विमान प्रवाशांना घेऊन हैदराबादला अन लगेज् नाशिकमध्येच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.