Nashik ZP News : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत १५ लाखापर्यंतची सर्व कामे यापुढे आता जिल्हा परिषदेतून वाटप होतील. लॉटरी आणि ई निविदा या दोन प्रकारांतून सुशिक्षित बेरोजगार, मजूर संस्था आणि सर्वसाधारण अशी वाटप केली जाणार आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ग्रामपंचायतींना कामे देण्यावर निर्बंध आल्याने ती जिल्हा परिषदांमार्फत वाटप होणार आहे. १५ व्या वित्त आयोगातील कामांचे वाटप करताना ग्रामपंचायतींना प्राधान्य दिले जात होते. (powers of Gram Panchayats are now vested in Zilla Parishad for works up to 15 lakhs Allocation )