Inspirational Story : दिव्यांगत्वावर मात करीत प्रसादचे यश! मामांकडे शिकत दहावीत 91 टक्के गुण

Nashik News : प्रसाद नामदेव अहिरे (गुजर) याने आपल्या शारीरिक दिव्यांगत्वावर मात करून दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळविले.
Father Namdev and mother Sunita congratulate Prasad
Father Namdev and mother Sunita congratulate Prasad esakal
Updated on

मालेगाव : ध्येयाचा ध्यास लागला की कशाचाही त्रास वाटत नाही. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे...’ या उक्तीचा प्रत्यय साकारत मुकबधीर असलेल्या प्रसाद नामदेव अहिरे (गुजर) याने आपल्या शारीरिक दिव्यांगत्वावर मात करून दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळविले. प्रसादने मिळविलेले यश सर्वसामान्य विद्यार्थ्यांपुढे नवा आदर्श निर्माण करणारे आहे.

मुळ चाळीसगाव येथील असलेल्या नामदेव अहिरे व सुनीता अहिरे यांचा हा मुलगा. आई-वडील थोड्या शेतीसह भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. चिखलओहोळ (ता. मालेगाव) येथील शिक्षक असलेले मामा समाधान चव्हाण यांनी त्याला दहावीत नियमित शिक्षण घेण्यासाठी कर्मवीर नारायण सर्जेराव देशमुख विद्यालयात प्रवेश मिळवून दिला.

तसे पहिली ते नववीपर्यंत शिक्षण पुण्यातील टिंगरे नगर येथील स्व. सी. आर. रंगनाथन् वसतीगृहात झाले. चिखलओहोळ येथील शिक्षकांना सामान्य विद्यार्थ्यांसमवेत प्रसादला शिकवताना वेगळी मेहनत घ्यावी लागली. वर्गात प्रसादला काही न समजल्यास शिक्षक त्याला नंतर स्वतंत्र व्हीडिओच्या माध्यमातून अध्यापन करीत होते. (latest marathi news)

Father Namdev and mother Sunita congratulate Prasad
Nashik Lok Sabha Code Of Conduct : आचारसंहितेत अडकली टंचाई आढावा बैठक

निकाल कायम स्मरणात राहील

दहावीतील यशासाठी वर्षभर खूप मेहनत घेतली. दहावीत चांगले टक्के मिळावेत, अशी सगळ्यांची इच्छा असते. त्याप्रमाणे माझीही होती. शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे, वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि आई-बाबांच्या कष्टामुळे हे यश संपादन करू शकलो, अशा भावना प्रसादने कागदावर लिहून प्रकट केल्या.

"मुलाच्या या यशामुळे आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला. शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. भविष्यात त्याने खूप मोठे व्हावे. स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी आमची इच्छा आहे." - सुनीता अहिरे (गुजर), आई

Father Namdev and mother Sunita congratulate Prasad
Nashik News : जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेत फूट! राजकारण तापले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.