Nashik Pre-Monsoon News : मॉन्सूनपूर्व पावसाने 6 व्यक्तींचा घेतला बळी! 1 हजार 563 घरांची पडझड

Nashik News : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले असून, नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या तीन महिन्यांत सहा व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Nashik Pre-Monsoon News
Nashik Pre-Monsoon Newsesakal
Updated on

Nashik News : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले असून, नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या तीन महिन्यांत सहा व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक हजार ५०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. केवळ मनुष्य नव्हे, तर पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने जिल्ह्याला मॉन्सूनपूर्व पावसाचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येते. भीषण दुष्काळाचा सामना करताना शेतकऱ्यांनी चारा, पाणी विकत घेऊन जगवलेल्या जनावरांना मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला आहे. (6 people have unfortunately died in last 3 months due to Pre Monsoon)

आतापर्यंत १३ म्हशी, नऊ बैल, पाच शेळ्या व तब्बल ४७५ कुक्कट पक्षी अर्थात कोंबडीच्या पिलांचा मृत्यू झाला. अंगावर वीज पडून किंवा भिंत कोसळल्याने सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. यात बापू अशोक वैद्य (वय ३०, ता. निफाड) यांचा ४ जूनला अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. फुलाबाई रोहिदास चौधरी (३५, रा. पिंपरखेड, ता. दिंडोरी) या अनिता पवार यांच्या शेतात काम करीत असताना अंगावर भिंत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

यादव नामदेव बोरसे (४८, रा. तोरंगण, ता. त्र्यंबकेश्‍वर) यांचा ९ जूनला वीज पडून मृत्यू झाला. दोन दिवसांपासून चांदवड, देवळा, मालेगाव व नांदगाव या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांचा मारा होत असल्याने अनेक घरांचे छत उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने पशु, पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

वासराचा मृत्यू झाला म्हणून त्याच्या जवळ गेलेल्या आकाश शरद देवरे याचाही उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी एका तरुणाचा जीव मॉन्सूनपूर्व पावसाने घेतला आहे. देवीदास भाऊराव अहिरे (३४, रा. उमराणे, ता. देवळा) यांच्या अंगावर शेडची भिंत कोसळल्याने त्यांचा अंत झाला. (latest marathi news)

Nashik Pre-Monsoon News
Nashik Mango News : यूएसए, ऑस्ट्रेलियाला 1 हजार टन आंबा निर्यात; कोकणचा हापूसही कृषक विकिरण केंद्रातून विदेशात

रविवारी (ता. ९) दुपारी ही घटना घडली. विलास जंगलो गायकवाड (२८, रा. खादगाव, ता. नांदगाव) यांच्या अंगावर मंगळवारी (ता. ११) दुपारी वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद शासन दप्तरी झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली; तर शेळ्या, मेंढ्या व जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत.

वारसांना आर्थिक मदत

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दिंडोरीतील एका व्यक्तीला ही मदत मिळाली. दोन प्रस्ताव मंजूर झाले असून, येत्या काही दिवसांत त्यांना आर्थिक मदत मिळेल. पशुधनाच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाते. त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

तालुकानिहाय नुकसान

तालुका.........बाधित क्षेत्र (हेक्टर)....बाधित घरे.....जीवित हानी

नाशिक.........८.२३...........................२९................वासराचा मृत्यू

दिंडोरी..........२७............................५९...............एका व्यक्तीचा मृत्यू

निफाड............१.२०.........................१८................एका व्यक्तीचा व म्हशीचा मृत्यू

इगतपुरी...........१०............................००..............००

सिन्नर..............००...........................६८..............गायीचा मृत्यू

पेठ....................१४१३.......................२६४...........गाय, दोन बैलांचा मृत्यू

देवळा.................२.९०.......................१५...........दोन व्यक्तींसह म्हैस, बैल, वासराचा मृत्यू

मालेगाव.............००....................००.................गाय, म्हैस, बैल, वासराचा मृत्यू

नांदगाव..............०.६०.................११................तीन गायी, बैल, पाच शेळ्यांचा मृत्यू

त्र्यंबकेश्‍वर..........२०६..................५४७...............००

चांदवड................००.....................४६.................चार गायींचा मृत्यू

कळवण................००.....................१०................००

येवला...................००......................१७................गाय, बैलाचा मृत्यू

बागलाण..............०.६०....................१०...............कुक्कटपालन पक्षी ४७५

सुरगाणा...............९३१.८६...............४६९.............दोन बैलांचा मृत्यू

एकूण....................२६०१...................१५६३..........चार व्यक्तींसह गाय, १३ म्हशी, नऊ बैल, तीन वासरू, पाच शेळ्या व ४७५ कुक्कट पक्ष्यांचा मृत्यू

Nashik Pre-Monsoon News
Nashik News : एअरलाईन्सचा गलथानपणा! विमान प्रवाशांना घेऊन हैदराबादला अन लगेज् नाशिकमध्येच

हे ‘ॲप’ सांगते कुठे वीज पडणार?

पावसाळ्यात कधी, कोठे वीज कोसळेल, याचा अचूक अंदाज येत नसल्याने अनेकदा निष्पाप बळी गेले आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ‘दामिनी' व ‘सचेत’ हे दोन ॲप उपलब्ध करून दिले आहेत. ॲप उघडल्यावर लाल रंग आपल्याला सात मिनिटांत आपल्या भोवती कुठे वीज पडणार, याविषयी माहिती देतो.

पिवळा रंग आपल्याला १४ मिनिटांत कुठे वीज पडणार, याची माहिती देतो. निळा रंग २१ मिनिटे अगोदर वीज पडण्याचे ‘लोकेशन’ दाखवितो. त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून संभाव्य नुकसान टाळणे शक्य झाले आहे. https://play.google.com/store/apps/details0id=com.lightening.live.damini या लिंकवरून ॲप डाउनलोड करू शकतात.

Nashik Pre-Monsoon News
Nashik Onion News : कांदा पुन्हा रडवणार महिन्यात भाव दुप्पट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com