नाशिक : जिल्ह्यात अवकाळी आणि पूर्व मोसमी वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात देवळा तालुक्यातील उमराणे येथील अनुप पवार यांचे कांदा शेडचे नुकसान झाले तर शेड कोसळून देविदास अहिरे यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तातडीने पंचनामा करून मदत पोहचविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. (Dada Bhuse statement of Do not get discouraged Government with farmer )
काल झालेल्या वादळी पावसामुळे उमराणे येथील अनुप पवार यांचे कांदा शेडचे नुकसान झाले तर देविदास अहिरे यांचे निधन झाल्यास परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पालकमंत्री दादाजीयांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आ. डॉ. राहुल आहेर हे देखील उपस्थित होते.
उमराणे येथील कांदा शेड कोसळून देवीदास भाऊराव अहिरे (वय ४०) रा. तिसगाव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर गायत्री सूरज देवरे (वय २२) व अभय अजय देवरे (वय साडे तीन वर्षे) हे जखमी आहेत. या वादळात उमराणे येथे बहुतांश कांदा शेड्स व घरांचे नुकसान आहे. या घटनेचे तातडीने पंचनामे करण्याची सूचना मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. (latest marathi news)
दरम्यान ,उमराणे व तिसगाव परिसरात रविवारी दुपारी झालेल्या वादळामुळे जीवित हानी आणि अनेक घरांचे पत्रे उडाल्याने आर्थिक नुकसान झाले असून, मुंबई आग्रा महामार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली. यात वीजपुरवठा खंडित झाला आहे, प्रशासनाला यंत्रणा राबवून तातडीने वीजपुरवठा तसेच सर्व पूर्ववत करण्याची सूचना मंत्री भुसे यांनी दिली आहे.
प्रशासकीय यंत्रणेसह आज मंत्री भुसे यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानाची पाहणी केली. या घटनेत तिसगाव येथील दोन व्यक्तींचा आकस्मित मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी भुसे म्हणाले की, खचून जावू नका शेतकऱ्यांसोबत सरकार खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करू. यंत्रणेला सूचना दिली असून लवकरात लवकर मदत राज्य शासनातर्फे करण्यात येईल. वादळाचा अंदाज घेवून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील भुसे यांनी केले. शासकीय यंत्रणेला देखील सतर्क राहण्याचा सूचना केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.