Jayant Patil News : केंद्रीय मंत्री अमित शहांकडून पराभवाचा अंदाज! NCPचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

Latest Political News : शिवस्वराज्य यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टीका केली.
amit shah & jayant patil
amit shah & jayant patilesakal
Updated on

नाशिक : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतदेखील भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात पीछेहाट होत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विभागनिहाय बैठका घेऊन विधानसभेतील पराभवाचा अंदाज घेत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

शहा यांच्याकडून किती जागांवर पडणार आहोत, याचा आढावा घेतला जात असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठीदेखील हा संदेश असल्याची टिप्पणी पाटील यांनी केली. (Criticism of NCP state president Jayant Patil on amit shah)

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टीका केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्रातील भाजपची जबाबदारी उपमुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे असली तरी दिल्लीतील श्रेष्ठींचा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला आहे.

त्यामुळेच शहा विभागनिहाय विधानसभेतील पराभवाचा अंदाज घेत आहेत. भाजपच्या जवळ जे जातात त्यांना सगळे माफ असते, मात्र त्यांच्याविरोधात गेलात की ते लोक तुमच्या विरोधात बोलायला लागतात, असे सांगत पाटील यांनी एकनाथ खडसे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

महसूलमंत्री राधाकृष्ण पाटील व अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील खडाजंगीवर बोलताना आता सरकारची तिजोरी साफ झाली असून, अर्थमंत्री अनेक प्रस्ताव नाकारत असल्याचे सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत टोकाची भांडणे होत असून, प्रत्येक आठवड्याला आता संवादाऐवजी भांडणेच होतील, असे पाटील म्हणाले. (latest marathi news)

amit shah & jayant patil
Jayant Patil News: यापुढे कंत्राटदारांच्या आत्महत्या दिसतील..., जयंत पाटलांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मराठा आरक्षणावर बोलताना पाटील म्हणाले, की मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील स्वतंत्रपणे आंदोलन करून सरकारकडे मागण्या मांडत आहेत. सरकार त्या संदर्भात लवकर निर्णय घेत नाही. जरांगे यांचे आंदोलन असो किंवा ओबीसी समाजाच्या लोकांचे आंदोलन असो सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असंतोष असून, आता हे कोण कोणाच्या जवळ आहे, असा निष्कर्ष काढून प्रकाश आंबेडकर लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातूनच उमेदवारीसाठी अर्ज केल्याचा दावा पाटील यांनी करताना राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला नसल्याचे स्पष्टीकरणदेखील दिले.

बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे समर्थन करत नाही. मात्र या एन्काउंटर संदर्भात वेगळी माहिती दिली जात आहे. ज्या संस्थेत अक्षय शिंदे होता त्या संस्थेचे पदाधिकारी व संस्थाचालक यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

amit shah & jayant patil
Jayant Patil News : नराधम गेला पण शिक्षणसंस्थेचे काय? शिवस्वराज्य यात्रेतून जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.