Nashik Police Written Test: पोलिस भरतीच्या ‘लेखी’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात! शहराची KTHM तर, ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

Police Recruitment : मुंबई वगळता राज्यभरात व शहर - ग्रामीण पोलीसांकडून लेखी परीक्षेसाठी जय्यत तयारी सुरू असून, नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.
Written Test
Written Testesakal
Updated on

Nashik Police Written Test : लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेली पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पडली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना लेखी परीक्षेची ओढ लागली असून ही परीक्षा येत्या रविवारी (ता. ७) होते आहे. मुंबई वगळता राज्यभरात व शहर - ग्रामीण पोलीसांकडून लेखी परीक्षेसाठी जय्यत तयारी सुरू असून, नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. (Nashik Preparation for Police Recruitment Written Test in Final Phase)

नाशिक शहर आयुक्तालयातील शिपाईपदाच्या ११८ रिक्त जागांसाठी सुमारे ७ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील ४ हजार ३७४ उमेदवारांची मैदानी चाचणी दिली होती. दोन तृतीयपंथी उमेदवारांसह शेकडो उमेदवार ५० पैकी २५ गुणही न मिळवू शकले.

त्यामुळे असे उमेदवार नापास झाले आहेत. तर, उर्वरित उमेदवारांची प्रवर्गनिहाय लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयातर्फे घेण्यात येणारी लेखी परीक्षा गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयात घेतली जाणार आहे.

तसेच, नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त ३२ जागांसाठी सुमारे तीन हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. यात २ हजार ६०२ पुरुष, ५७६ महिला, ४२ माजी सैनिक व इतर पाच उमेदवारांच्या अर्जांचा समावेश होता. यातील ३ हजार १६० उमेदवारांनी मैदानी चाचणीला पाचारण केले असता, १ हजार ८१८ उमेदवारांनी हजेरी लावली. छाती, उंची व अन्य निकषांअंती २५३ उमेदवार अपात्र ठरले. तर, एका उमेदवाराने माघार घेतली होती. (latest marathi news)

Written Test
Nashik Police Recruitment : पोलिस शिपाई भरतीसाठी पदवीधरांनीही आजमावले नशिब; बेरोजगारीची दाहकता

ग्रामीण पोलीस दलातर्फे रविवारी (ता. ७) होणारी लेखी परीक्षा आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी ३१६ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, खुल्या प्रवर्गाचा ‘कटऑफ’ ४३ गुणांचा आहे, तर ६८० उमेदवारांना २५ पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत.

दीड तासांचा अवधी

पोलीस भरतीकरीता येत्या रविवारी (ता. ७) लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून उमेदवारांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांना सकाळी ७ वाजता परीक्षा केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहावयाचे आहे. १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी दीड तासाचा (९० मिनिटे) अवधी दिला जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडींवर ही परीक्षा आधारित असून, किमान ४० टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.

Written Test
Police Recruitment Written Exam : पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा 7 जुलैला! उमेदवारांना प्रतिक्षा प्रवर्गनिहाय निवड यादीची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.