Nashik Unseasonal Rain Damage : ऐन निवडणुकीत ‘वळिवा’च्या पंचनाम्यांचे आदेश! 41 गावांतील 513 हेक्टरवरील पिकांना फटका

Nashik News : लोकसभा निवडणुकीचे मतदान सात दिवसांवर येऊन ठेपल्याने मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना आता वळिवाच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निघाले आहेत.
orders issued to assess damage caused by Unseasonal rains
orders issued to assess damage caused by Unseasonal rainsesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीचे मतदान सात दिवसांवर येऊन ठेपल्याने मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना आता वळिवाच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निघाले आहेत. निवडणुकीला प्राधान्य द्यावे की ‘वळिवा’च्या पंचनाम्यांना, याचा प्राधान्यक्रम ठरविताना शासकीय कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (orders issued to assess damage caused by Unseasonal rains)

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार ४१ गावांतील ५१३ हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसला असून, एक हजार ३३८ शेतकरी बाधित झाले आहेत. हवामानातील बदलामुळे २०१५ पासून मार्च, एप्रिलमध्ये पावसाचे प्रमाण वाढीस लागले आहे. गेल्या साधारणत: नऊ वर्षांचे पावसाचे आकडे पाहिले तर दरवर्षी मार्च व एप्रिलमध्ये पाऊस झालेला दिसून येतो.

कोरडवाहू शेतकऱ्यांना त्याचा फारसा फटका बसलेला नाही; पण बागायतदार आणि फळपिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. यंदाही मार्च व मेमध्ये वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सात दिवसांनी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने २१ हजार ११० कर्मचाऱ्यांना कामाला लावले.

पण, वळिवाच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मिळाले आहेत. गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे पंचनामे करतील. त्यातील अनेकांना निवडणुकीचे कामकाज असल्याने प्रशिक्षणासाठी त्यांना उपस्थित राहावे लागेल. त्यामुळे दोन्हीकडे वेळ देताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (latest marathi news)

orders issued to assess damage caused by Unseasonal rains
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रावर सेक्टर अधिकार्यांचा असेल ‘वॉच’; शहर विशेष शाखेचे नियोजन

दिंडोरी, कळवण, चांदवड या ग्रामीण भागाला पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यात ८ ते ११ मेदरम्यान झालेला वळिवाचा पाऊस आणि गारपिटीने ५१३ हेक्टवरील शेतीपिकांना फटका बसला. यात सर्वाधिक ४७५ हेक्टरवरील आंब्यांचे नुकसान झाले आहे. पेठ तालुक्यात ४६९ हेक्टरवरील आंबा व २४ हेक्टरवरील अन्य पिकांचे नुकसान झाले. यात डाळिंब ४.५० हेक्टर, द्राक्षे १.२१ हेक्टर व आंबा ४६९ हेक्टरचे नुकसान झाले.

"निवडणुकीचे कामकाज सांभाळून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच ठिकाणी नुकसान झालेले नसल्याने ठराविक ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचीच अडचण होऊ शकते." - जलज शर्मा, जिल्हाधिकारी

एप्रिल २०२३ मध्ये झालेले नुकसान

बाधित शेतकरी : ७९ हजार ४३८

बागायत क्षेत्र : ३७ हजार ५४५ हेक्टर

फळपिके : ५७९२.१४ हेक्टर

एकूण : ४३ हजार ३४०

गेल्या पाच वर्षांचे सरासरी पर्जन्यमान (मिलिमीटर)

वर्ष ..….....सरासरी..........प्रत्यक्ष.........टक्केवारी

२०२२.........९३३.८०.........१,३३१.४०.....१३४

२०२१.........१,०४३.६०.......९८४.६०........९६

२०२०.........१,०४३.............९८४.६०.........९४

२०१९..........१,०७४............१,१६७.............१०९

२०१८.........१,०७४...........६३१.५६...........५९

orders issued to assess damage caused by Unseasonal rains
Nashik PM Narendra Modi : शहर-जिल्ह्यात प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्याची शक्यता; मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com