Nashik Water Supply : स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाणात राबविण्यात आलेल्या योजनेंतर्गत २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्याची क्षमता प्रकल्पात असली तरी प्रतिमाणशी १३५ लिटर्स पाणीपुरवठा करण्याचा नियम व गंगापूर धरणातील आरक्षित पाण्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर बंधने येत आहे. यामुळे प्रकल्प हस्तांतरणासह चोवीस तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव थांबविण्यात आला आहे. ( Presently 24 hours water supply red signal by nmc )