पिंपळगाव बसवंत : तेल, मररोगामुळे नाशिक जिल्ह्यात डाळिंब पिकांचे क्षेत्र काहीसे घटले. त्याचा परिणाम म्हणून पिंपळगाव बाजार समितीत डाळिंबांची आवक काही प्रमाणात घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र डाळिंबांच्या दरात चांगली तेजी आली आहे. पिंपळगाव बाजार समितीत उच्च दर्जाच्या डाळिंबांना दोनशे रुपये प्रतिकिलो असा दर मिळतो आहे. दर पाहता लालभडक अन भाव कडक अशी स्थिती डाळिंबांची आहे. (price of pomegranate two hundred rupees per kg)