Nashik Tomato Rates : टोमॅटोच्या दराची लाली उतरली! आठवड्याभरात आठशे रुपयांची घसरण; प्रति कॅरेटला पाचशेचा भाव

Nashik News : पेठरोड येथील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात शुक्रवार (ता.२) रोजी झालेल्या लिलावात टोमॅटोच्या प्रती कॅरेटला (वीस किलो जाळी) सर्वाधिक पाचशे रुपये रुपये तर सरासरी साडेचारशे रुपये भाव मिळाला.
Tomato Rates fall
Tomato Rates fallesakal
Updated on

पंचवटी : गेल्या महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत होता. सद्यस्थितीत टोमॅटोची लाली कमी होताना दिसून येत आहे. बाजारभाव घसरू लागले आहेत. पेठरोड येथील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात शुक्रवार (ता.२) रोजी झालेल्या लिलावात टोमॅटोच्या प्रती कॅरेटला (वीस किलो जाळी) सर्वाधिक पाचशे रुपये रुपये तर सरासरी साडेचारशे रुपये भाव मिळाला. (price of tomatoes gone down Eight hundred rupees fall in week)

सद्यस्थितीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सटाणा, कळवण, सिन्नर, घोटी, पिंपळगाव खांब, बाभळेश्वर, मोहगाव, शिंदे, पळसे, पांढुर्ली, त्रंबक, निफाड व शहरालगतच्या म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद, नांदूर मानूर, सातपूर, बेळगाव ढगा, महिरावणी आदी भागांतून टोमॅटोची आवक होत आहे. यात सर्वाधिक टोमॅटो आवक ही सिन्नर येथून होत आहे.

शुक्रवारी (ता.२) आवक सुमारे साडे पाच हजार कॅरेट झाली असून सर्वाधिक दर पाचशे रुपये मिळाला आहे. सरासरी साडेचारशे रुपये प्रति कॅरेट भाव मिळाला. नाशिकमधील पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात येणारा टोमॅटो हा गुजरात, राजस्थान, वापी, जयपूर आदी भागात जातो.

मागील महिन्यात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत होता. जुलै महिन्यामध्ये २५ तारखेपर्यंत टोमॅटोचा भाव जवळपास साडेबाराशे ते साडे तेराशे रुपये अशा उच्चांकी पातळीवर होता. शेतकऱ्यांना बऱ्याच काळानंतर असा बाजारभाव मिळत होता. मात्र, सद्यस्थितीत टोमॅटोच्या बाजारभावाला आलेली लाली ही कमी होऊ लागली आहे. (latest marathi news)

Tomato Rates fall
Jitendra Awhad : घोडा माझा लाडका! डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची मिश्कील टीप्पणी

बंगलोर-सातारा मालामुळे घसरले बाजारभाव

आजमितीला बाजारभाव हा साडेचारशे ते साडेपाचशे असा मिळू लागला आहे. याला बंगलोर व सातारा तसेच कोल्हापूर या भागातून होणाऱ्या टोमॅटोची आवक कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत साताराहून टोमॅटो जात आहे. बंगलोरहून येणारा टोमॅटो हा जवळपास १५ ते २० रुपये किलो दराने मिळत आहे.

त्यामुळे नाशिकहून जाणाऱ्या मालाला बाजारात उठाव मिळत नाही. तसेच पुण्यातील नारायणगाव येथे आवक चांगली आहे. तसेच मागील महिन्यात चांगला बाजारभाव मिळत होता, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी अधिकाधिक लागवड केली. परिणामी उत्पादन वाढल्यामुळे टोमॅटोची लाली उतरली असून बाजारभाव घसरू लागले आहेत.

Tomato Rates fall
Nashik Dengue Update: 3 हजार घरांमध्ये डेंगीच्या अळ्यांचे अड्डे! तपासणीत प्रकार उघडकीस, 515 नागरिकांना नोटिसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.