Ashadhi Ekadashi 2024 : आषाढीनिमित्त उपवास पदार्थांच्या भावात मोठी तेजी

Ashadhi Ekadashi : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त शहरातील सर्वच लहान- मोठ्या मंदिरातील गर्दीत वाढ होत आहे.
Ashadhi Ekadashi 2024 Fasting Food
Ashadhi Ekadashi 2024 Fasting Food Sakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2024 : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त शहरातील सर्वच लहान- मोठ्या मंदिरातील गर्दीत वाढ होत आहे. आषाढीनिमित्त हिंदू धर्मीय उपवास करतात, त्यामुळे उपवासाच्या पदार्थ्यांच्या भावातही तेजीत आहे. बुधवारी (ता. १७) आषाढी एकादशी आहे. यानिमित्त शहरातील भाविकांचा ओघ वाढला आहे. यात राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे श्री काळाराम, कपालेश्‍वरासह अन्य मंदिरातील गर्दीत वाढ झाली आहे. (prices increase of fasting food onoccasion of Ashadhi Ekadashi )

मंगळवारी (ता.१५) ही भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. आषाढीसाठी विविध मंदिरांसह जुन्या नाशिकमधील नामदेव विठ्ठल मंदिर, कॉलेज रोडवरील विठ्ठल मंदिर, श्री काळाराम मंदिर दक्षिण दरवाजाजवळील विठ्ठल मंदिर, हुंडिवाला लेनमधील संत ज्ञानेश्‍वर व विठ्ठल मंदिर या ठिकाणी सकाळपासून विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विविध सामाजिक संस्था व सार्वजनिक मंडळांतर्फे खिचडीसह अन्य उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले जाणार आहे. (latest marathi news)

Ashadhi Ekadashi 2024 Fasting Food
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त वाळूज पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल

आषाढीनिमित्त मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीला भाविक मोठ्या संख्येने उपवास करतात. त्यामुळे केळी, सफरचंद, रताळी, भगर, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा आदी पदार्थाच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु डझनभर केळीसाठी चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागत आहे, तर सीझन नसल्याने सफरचंदाचे भावही दोनशे रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. याशिवाय भगर, साबुदाणा, शेंगदाणे यांच्या भावातही वाढ झाली आहे.

Ashadhi Ekadashi 2024 Fasting Food
Ashadhi Ekadashi 2024 : उपवासाला होतोय पित्ताचा त्रास? खा हे पौष्टिक पदार्थ अन् पहा चमत्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.