Nashik News : गेल्या काही दिवसांपासून आवक घटली असल्याने भाजीपाल्याच्या दरांनी अचानक उसळी घेतली आहे. बहुतांश भाज्यांच्या दरांनी शंभरी गाठली आहे. टोमॅटोची लालीदेखील वाढली असून, साठ ते सत्तर रुपये किलोपर्यंत दर पोचले आहेत. भाजीपाल्याचे दर कडाडल्याने सर्वसामान्यांना खिसा हलका करावा लागतो आहे. जून महिन्याचे दहा दिवस उलटूनही अद्यापपर्यंत अपेक्षित पाऊस झालेला नाही. (prices of vegetables have increased as arrivals have fallen)
दुसरीकडे बाजार समितीमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या कृषी मालाच्या आवकेत मोठी घट झालेली आहे. यामुळे गेल्या दोन- तीन दिवसांमध्ये भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदविली गेली आहे. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे वाढलेले दर राष्ट्रीय स्तरावरील मुद्दा बनला होता. यानंतर मात्र आवक मुबलक राहिल्याने टोमॅटोचे दर स्थिर होते.
मात्र सध्या बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या जाळीचे दर एक हजार रुपयांपर्यंत पोचले असल्याने किरकोळ बाजारात पन्नास ते साठ रुपये किलो या दराने टोमॅटो विक्री होत आहे. कांद्याच्या दरांमध्येही वाढ होत असून, काही दिवसांपूर्वीपर्यंत २० ते २५ रुपये किलो विक्री होणारे कांदे सध्या चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
इतर बहुतांश भाज्यांचे दर शंभर रुपयांपर्यंत पोचले आहेत. शहरातील बहुतांश भाजी बाजारांमध्ये दर एकसारखेच बघायला मिळत आहेत. त्यातही कॉलेज रोड, गंगापूर रोड भागात हे दर पाच ते दहा रुपयांनी अधिक असल्याचेही निदर्शनात आले. (latest marathi news)
तर आणखी भडका
सध्या अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. जून महिन्यात पावसाने दडी दिल्यास येत्या काही दिवसांमध्ये भाजीपाल्याच्या दरांचा आणखी भडका उडण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तविली आहे. त्यामुळे उकाड्यापासून बचावासोबत खिशाला आधार मिळण्यासाठीदेखील नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागून राहणार आहेत.
असे आहेत भाज्यांचे दर-
(दर प्रतिकिलो रुपयांमध्ये)
टोमॅटो- ६० ते ७०
कांदा- ३५ ते ४०
बटाटा- ३५ ते ४०
भेंडी- ७० ते ९०
गिलके/दोडके- ७० ते ९०
शेवगा शेंगा- ८० ते ९०
फ्लॉवर- ३५ (प्रति नग)
गड्डा कोबी- ४० (प्रति नग)
कोंथिबीर- २० (जुडी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.