नाशिक : राज्यात महायुतीचे सरकार येणे का आवश्यक आहे, हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र व राज्य सरकारांच्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कसा लाभ झाला, हे पटवून दिले. महाराष्ट्रात ५० लाखांहून अधिक महिलांना उज्ज्वला योजनेची गॅसजोडणी, नळ-जल सुविधा, सात कोटींना मोफत अन्नधान्य या योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार आवश्यक आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपयांची मदत मिळाली, राज्यात पुन्हा सरकार आल्यास ही मदत १५ हजार रुपये करू, अशी घोषणा त्यांनी करताच त्याला टाळ्यांच्या गजरात जोरदार प्रतिसाद मिळाला. (Prime Minister announcement to help PM Kisan 15 thousand to farmers )