Nashik District Hospital : सिव्हिल, कारागृहातील खाबूगिरी पुन्हा चर्चेत!

Nashik News : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बंदिवानाने प्रिझन वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल होण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्याचा दावा केला आहे.
Nashik District Hospital
Nashik District Hospitalsakal
Updated on

Nashik News : जिल्हा शासकीय रुग्णालय आणि कारागृहातील छुपे आर्थिक संबंध लपून राहिलेले नाही. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बंदिवानाने प्रिझन वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल होण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्याचा दावा केला आहे. यामुळे सिव्हिल, कारागृहातील खाबूगिरी पुन्हा चर्चेत आली आहे. बंदीच्या नातलगाने जिल्हा व सत्र न्यायालयात याबाबत अर्ज केल्याचे समजते. (prisoner came to district hospital for treatment claimed that he had to pay for admission)

हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी (रा. इगतपुरी) असे बंदीचे नाव आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहातून खुनाच्या गुन्ह्यातील बंदिवानास जिल्हा रुग्णालयात मंगळवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, आरडाओरड करीत त्याने जिल्हा रुग्णालयासह कारागृहावर आर्थिक लागेबांधेचे आरोप केले.

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी ६० ते ७० हजार रुपयांची मागणी केली जाते. त्याशिवाय जिल्हा रुग्णालयात दाखल केले जात नाही. एका वैद्यकीय अधिकाऱ्यानेच आपल्याला याबाबत सांगितले असून, कारागृह पोलिसही तसेच म्हणालयाचा दावा बंदी भंडारी याने केला आहे.

Nashik District Hospital
Nashik Vaibhav Deore Case : खंडणीखोर वैभव देवरे यास सशर्त जामीन; पोलिसांची नामुष्की

त्यामुळेच आपण कारागृहाच्या भिंतीवर डोके आपटून घेतल्याचे दावा त्याने केला आहे. याबाबत त्याच्या नातलगाने न्यायालयात लेखी अर्ज केल्याचे समजते. दरम्यान, बंदीने केल्या आरडाओरडची माहिती कळताच सरकारवाडा पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.

मात्र उपचारासाठी दाखल बंदिवानाच्या यकृताला सूज आणि नाकाचे हाड वाढल्याने तो त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याने केलेल्या दाव्यामुळे मात्र जिल्हा रुग्णालय आणि कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.

Nashik District Hospital
Nashik Fraud Crime News: फर्टिलायझर कंपनीची लाखोंची फसवणूक; खत विक्रत्याला इंदिरानगर पोलिसांकडून अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.