Nashik: कैद्यांना स्मार्टफोनद्वारे साधता येणार नातलगांशी संवाद! जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्या. मोरे यांच्या उपस्थितीत प्रारंभ

Nashik News : नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी कैद्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांशी सहजपणे संवाद साधता यावा, या उद्देशाने ऍलन कंपनीने स्मार्टफोन बसविले आहेत.
officers and staff were present at the launch of the smartphone communication facility.
officers and staff were present at the launch of the smartphone communication facility.esakal
Updated on

नाशिक : नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी कैद्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांशी सहजपणे संवाद साधता यावा, या उद्देशाने ऍलन कंपनीने स्मार्टफोन बसविले आहेत. कारागृहामध्ये नातलगांशी संवाद साधण्यासाठी अनेक अडचणी येत. संवाद साधणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे कारागृह प्रशासनावरही ताण निर्माण होत असत. या गोष्टी लक्षात घेत ही नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. (Nashik Prisoners can communicate with relatives through smartphones news)

कुटुंबातील सदस्यांशी बंदी कैद्यांना बोलता यावे, यासाठी ऍलन कंपनीने स्मार्टकार्ड बंदी कैद्यांना कारागृहात प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिले. ते कार्ड बंदी कैद्यांजवळच असते. बंदी कैदी एकावेळेस सहा मिनिटे असे आठवड्यातून तीन वेळा नातलगांशी संवाद साधू शकतो.

यामध्ये कैद्यांचे कुटुंबातील तीन सदस्य व वकील असे एकूण चार मोबाईल क्रमांकाची नोंद घेऊन तपासून कैद्यांना संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये संपूर्ण देशभरातील बंदी कैदी आहेत. त्यांच्या नातलगांना त्यांची भेट घेण्यासाठी इतक्या दुरून प्रवास करावा लागत असे. मात्र आता स्मार्टफोन माध्यमातून बोलणे शक्य झाल्यामुळे काही प्रमाणात का होईना, त्यांना दिलासा मिळाला आहे.

officers and staff were present at the launch of the smartphone communication facility.
Nashik News : मॉडेल रोडच्या सलग कामाला विरोध; 4 टप्प्यात कामाची अपेक्षा

नाशिक मध्यवर्ती कारागृहात सुमारे दोन हजार पाचशेहून अधिक बंदी कैदी आहेत. यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असलेले व दोष सिद्ध झालेले महिला व पुरुष आहेत. बंदी जणांना आपल्या रक्तातील नातेवाईकांशी संवाद साधण्याची परवानगी प्रशासनामार्फत आहे. मात्र ही सुविधा देशविरोधी कृत्य वा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले आरोपी वा दोषसिद्ध झालेले यांना उपलब्ध नाही.

"बंदी कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्याची परवानगी आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अगदी सहजपणे त्यांना कुटुंबातील सदस्यांशी बोलता येईल. कुटुंबातील सदस्यांशी जर नियमितपणे संवाद होत राहिला तर निश्चितच त्यांची मानसिक स्थिती योग्य राहील."

- अरुणा मुगुटराव, कारागृह अधीक्षक, नाशिक

officers and staff were present at the launch of the smartphone communication facility.
Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयाचे मनपाच्या जागेवर अतिक्रमण! परवानगी न घेताच तलाठी कार्यालयाचे बांधकाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.