Nashik News : राष्ट्रीय बागवानी केंद्राने बनवली खरेदी-विक्रीसाठी प्रायव्हेट कंपनी! फक्त दोन्ही सिंग भागीदार

Nashik : १९७७ पासून अस्तित्वात असलेल्या या कंपनीचे मुख्यालय नाशिकच्या चितेगावहून थेट दिल्लीत हलवले गेले.
National Horticulture Research Center building here.
National Horticulture Research Center building here.esakal
Updated on

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कांदा व इतर भाजीपाला बियाण्यांच्या संशोधनात व विक्रीत ‘नाफेड’ अंतर्गत राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र अनेक दशके काम करीत असताना आता याच कंपनीने इंग्रजीतील शॉर्टकट नाव वापरून ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी निर्मित केली असून, कंपनीच्या अनेक संचालक, वरिष्ठ अधिकाऱ्यांना व ‘नाफेड’ला याबाबत कोणतीही माहिती नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. १९७७ पासून अस्तित्वात असलेल्या या कंपनीचे मुख्यालय नाशिकच्या चितेगावहून थेट दिल्लीत हलवले गेले. (nashik private company for buying and selling formed by National Horticulture Centre )

त्यानंतर कंपनीच्या नियमामध्ये अनेक बदल होत हळूहळू हे संशोधन बोर्ड बिजेंद्र सिंग यांच्या मालकीचे झाल्यात जमा आहे. त्यातच बियाणे खरेदी-विक्री करण्यासाठी आता याच कंपनीने ‘एनएचआरडीएफ प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची निर्मिती केली आहे. यामुळे भविष्याच्या वेधक अंदाजाबाबत संशय येणे क्रमप्राप्त झाले आहे. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये अस्तित्वात आलेल्या या खासगी कंपनीत कोणत्याही संचालकाला स्थान देण्यात आलेले नाही.

केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी राजबीर सिंग आणि बागवानी केंद्राचे एकहाती सर्वेसर्वा बिजेंद्र सिंग हेच दाखविण्यात आल्याने कंपनीअंतर्गत मोठा भूकंप झाला आहे. ‘नाफेड’चे चार संचालक समाविष्ट असलेल्या या केंद्राच्या कार्यकारिणीला मात्र यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याने भविष्यात यातून याच दोघांना काय साधायचे आहे, हे समजण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज पडणार नाही.

चाळीस वर्षे ‘नाफेड’चा अध्यक्ष हा ‘बागवानी केंद्राचा अध्यक्ष’ असा बायोलॉजिकल नियम असताना त्यालादेखील हरताळ फासून बारा-तेरा वर्षे बिजेंद्र सिंग दिल्लीस्थित सहकारसम्राट यावर हुकूमत गाजवत आहे. आधी हीच कंपनी ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर बियाणे विक्री करत असताना नवी खासगी कंपनी का, हा प्रश्‍न कायम आहे. याबाबत आधीच्या नियमांची आणि बदलल्या गेलेल्या नियमांची चौकशी करण्याचे आव्हान केंद्र सरकार व संबंधित यंत्रणेसमोर आहे. (latest marathi news)

National Horticulture Research Center building here.
Nashik News : इंदिरानगरला ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट; साथीचे रोग बळविण्याची शक्यता

बिजेंद्र-राजबिर सिंगच मालक का?

राजबिर सिंग भारतीय वनसेवेतील मोठे अधिकारी म्हणून निवृत्त होताच त्यांना बागवानी केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे लाभाचे पद निर्माण करून बहाल करण्यात आले. मुळात प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर दोन वर्षे कुठेही कॉर्पोरेट पद घेऊन शकत नसताना तेच या प्रायव्हेट कंपनीत सहभागी झाले आहे. तर बिजेंद्र सिंग यांचा रजबीर यांच्यावर विश्‍वास असल्याने त्यांनी पी. के. गुप्ता यांना ‘कात्रजचा घाट’ न दाखवता खालची खुर्ची दिली.

हेच गुप्ता आज बिजेंद्र सिंग यांचे दिल्लीतील नजफगड भागातील काही एकरवर असलेल्या आलिशान फार्महाउसवर काम करणाऱ्या लोकांचे पगार याच बोर्डच्या पैशातून करत परदेशदौरा, कोणत्याही निवडणुकीमध्ये नोटा उभारण्याचे काम करण्यात माहीर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

याच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आता हे दोघे पाच वर्ष नफा-तोटापत्रक बिनचूक सादर करून हीच कंपनी स्वमालकीची करण्यात कुचराई का नाही करू शकत, हा देखील मोठा प्रश्‍न आहे. सात वर्षांत कंपनीत झालेली नोकरभरती, अवेळी पगार, कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा पैसा सहकारी बँकेत ठेवण्यात दाखवलेला रस या बाबींची देखील सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, खासदार भास्कर भगरे हे सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन तातडीने चर्चा करणार आहेत.

''बुधवारी (ता. ३१) ‘नाफेड’ कार्यकारिणीची बैठक आहे. याच वेळी मी ‘एनएचआरडीएफ’बाबत चर्चा घडवून आणणार आहे. मागील काळात मुख्यालय आणि बोर्डाच्या कार्यकारिणीबाबतही झालेले नियम बदल आणि केलेल्या ठरावाची देखील चर्चा करून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली जाईल.''- केदा आहेर, संचालक, नाफेड

''आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. पण, त्यात केवळ दोघेच आहोत. याचा उद्देश एकच आहे, बियाण्यांची खरेदी-विक्री होत असताना आताच्या बोर्डाला काही अडचणी येत होत्या. नवी कंपनी जरी अस्तित्वात आली असली तरी त्याद्वारे अद्याप एकही व्यवहार झालेला नाही.''- बिजेंद्र सिंग, अध्यक्ष, एनएचआरडीएफ

National Horticulture Research Center building here.
Nashik News : नांदगावच्या शिवसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात! 32 फुटांचा अश्‍वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.